कांद्याने केला सर्वांना टाटा, पण मला बटाट्याने दिला अधिक नफ्याचा वाटा !

श्री. धोंडीभाऊ विष्णूजी नाईकरे (से.नि. विस्तार अधिकारी, पं.स. खेड)
मु.पो. कमान, ता. खडे, जि. पुणे- ४१०५१३.
मो. ९४२०१६१२७७



भुईमूग पीक काढल्यानंतर बटाटा लागवडीसाठी ट्रॅक्टरने कणणी करून शेणखत १ ट्रॉली आणि कोंबड खत १ ट्रॉली फोकून दिले. पुन्हा ट्रॅक्टरने फणणी करून खत जमिनीत कालवून घेतले. त्यानंतर पाणी देऊन जमीन ओलावली. ३ - ४ दिवसानंतर रान वाफश्यावर आल्यावर बैलाच्या ४ फणी यंत्राने सऱ्या पाडल्या. फण्यामध्ये १।। फूट अंतर असते. काकरी ४ - ५ इंच खोल होते.

२० गुंठ्यासाठी ७ कट्टे (३२५ किलो) सिमल्याचे जातीवंत पुकराज बटाट्याचे बेणे ११५० रू./क्विंटल दराने मंचरवरून आणले. लागवडीपुर्वी बटाट्याचे आकारमानानुसार डोळे वाचवून २, ३ ते ४ असे तुकडे करून जर्मिनेटर १ लिटरचे १०० लिटर पाण्यातील द्रावणात बॅरलमध्ये ५ ते १० मिनिटे बुडवून १० ते १५ मिनिटे सावलीत सुकवून लागवडीसाठी वापरले. नांगरीमागे ४ बायांनी दुपारीत २० गुंठे क्षेत्र लागवड केली. बायांना २०० रू. हजेरी आहे. जेवण आपण देतो, त्यामुळे संबंध चांगले राहिले आहेत. त्यामुळे वेगाने काम करतात. बेणे लावले की लगेच त्याच काकरीमध्ये २० गुंठ्यासाठी सल्फेट २ गोणी आणि पोटॅश १ गोणी दिले. नंतर वरंबा लाकडी नांगरीने फोडून नेमकी लागवड केलेल्या बेण्यावर माती जाऊन तेथे वरंबा तयार होतो आणि सरीमधुन पाणी सोडतो. अशा पद्धतीने लागवड केल्यानंतर ८ दिवसात बेणे चांगले उगवते. त्यानंतर २१ दिवसांनी युरियाच्या २ बॅगा आणि काळे थायमेट १० किलो एकत्र कालवून टाकतो व सरीतून पुन्हा नांगरी फिरवतो. म्हणजे आलेले बारीक तण निघते. खुरपणीची गरज भासत नाही.

त्यानंतर करपा, तांबेरा येऊ नये म्हणून सप्तामृताच्या १५ - २० दिवसांला एकूण ३ फवारण्या घेतो. शेत नदीच्या कडेला आहे. याच काळात नदीला पाणी सोडले होते त्यामुळे थंडीत धुके पडले. तेव्हा आमच्या भागात साधारण १ महिन्याचे बटाटे होते. त्या धुक्याचा परिसरातील बटाट्याला झटका बसला. परंतु आपण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत असल्यामुळे त्याचा पिकावर परिणाम झाला नाही. करपा येऊ नये म्हणून थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंट जास्त वापरले. तसेच बटाटे पोसताना राईपनर, न्युट्राटोन वापरले.

बटाट्यावर एरवी दुर्लक्ष झाले तर पीक ३० दिवसांचे असताना लहान करपा येतो. तर ४५ दिवसांनी तांबेरा येतो. या रोगांनी पुर्ण पीक वाया जाते.

साधारण ५५ दिवसात फुले निळसर पांढरी लागतात. सरांनी सांगितले कल्पतरू एकरी २ पोती आणि नंतर १ महिन्याने १ - २ पोती दिली असता बटाटा चांगला पोसतो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने अर्ध्या किलोच्या पुढे बटाट्याचे वजन भरते.

या बटाट्याची २९ नोव्हेंबर २०१५ ची लागवड असून तो १५ फेब्रुवारी २०१६ ला काढला. म्हणजे २।। महिन्यातच बटाटा काढणीस आला. ज्योती वाणाच्या बटाट्याला ३ महिने लागतात. ज्योती बटाटा टिकायला चांगला असून खाण्यास चवदार असतो. तो बटाटा संसारी, गोल, मध्यम आकाराचा असतो. त्यामुळे त्याला २ - ३ रू./किलो भाव जादा मिळतो. परंतु उत्पादन पुकराजच्या तुलनेच ५०% मिळते. पुकराजचे ७ कट्टे बेणे लावले होते त्यापासून ६० कट्टे म्हणजे ३० क्विंटल बटाटा उत्पादन झाले. याला ११-१२ रू./किलो भाव मिळाला. हा बटाटा आंबेगाव, जुन्नर, खोडला जास्त होतो.

सरांनी विचारलो ह्या बटाट्याचे भाव कमी झाले तर खडे तालुक्यात जसे घरटी बटाट्याचे किस व वेफर्स करतात तसे तुम्ही करता का ? त्यावर मी सांगितले की, यासाठी बटाटे शिजवण्यास इंधन (जळण) तसेच मनुष्यबळ लागते. ते आपणास शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही थेट मार्केट करतो. यावर सरांनी सांगितले ३० - ४० वर्ष आपण शिक्षण क्षेत्रात काम केले असल्याने शिक्षित आणि कुशल मजुर शोधणे आपणास अवधड नाही, तेव्हा तुम्ही बचत गट तयार करून पक्रिया उद्योगावर भर दिला तर आपला निवृत्तीच कला नैराश्येत न जाता समाज उपयोगी लागेल. त्यांना दिशा मिळून रोजगार उपलब्ध होईल. असे बटाट्याचे किस, वेफर्स, चिवडा, सांडवे याला उपवासामध्ये मोठी मागणी असते. तेव्हा प्रक्रिया केंद्र निर्माण करून बटाट्याचे मुल्यवर्धन केले की शेतकऱ्याला प्रक्रियेचे बाळकडू मिळेल असे सरांनी सांगितले. म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या एका पैशाचे दोन पैसे नव्हे तर १० पैसे करता येतील. असे अनेक प्रयोग सरांच्या मार्गदर्शनातून देशभर केले आहेत. जसे कैरीचे पन्हे, लोणचे, उडीद - मुग डाळींचे पापड, हरभरा डाळीचे विविध पदार्थ, तिळाचे लाडू, पापड्या, शेंगदाण्यापासून लाडू व चिक्की, ज्वारीपासून लाह्या, स्विटकॉर्न - पॉपकॉर्नचा मका, विविध पदार्थांचा चिवडा असे प्रक्रिया उद्योग निर्माण झाले आहेत.

या २० गुंठे बटाटे लागवडीसाठी बेणे खर्च ५००० रू. मशागत खर्च ४००० रू., मजुरी ३५०० रू., फवारणी २५०० रू., खते ५००० रू., असा एकूण २०,००० रू. खर्च आला. एकूण उत्पादन ३० क्विंटल मिळून ११ रू. भावाने ३३,००० रू. झाले. तसेच या बटाट्यामुळे जमिनीची प्रत सुधारते. बटाटा काढल्यावर लगेच मेथी करतो. ती डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने २१ दिवसात येते. २० गुंठ्याला ५० किलो बी टाकतो. साधारण एका गुंठ्यातून ५०० गड्डी याप्रमाणे १०,००० गड्डी निघते. सरासरी ५ रू. जरी भाव मिळाला तरी २१ दिवसात ५०,००० रू. अत्यंत कमी खर्चात होतात. मेथी काढल्यानंतर एप्रिलमध्ये भुईमूग लावला की तो जून अखेरीस निघतो. भुईमुगामध्ये झेंडूचे आंतरपीक चांगले येते. ही सर्व पिके बटाट्याच्या बेवडावर चांगली येतात.