२५ एकर कापसासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी ना रोग, ना कीड चालू कपाशीचे एकरी १५ क्विंटल उत्पादन

श्री. वरूण दत्तात्रय नाईक, मु.पो. गाढे जळगाव, ता.जि. औरंगाबाद.


मी दरवर्षी कापूस या पिकाची लागवड करत असतो. माझ्याकडे एकूण ५४ एकर जमीन आहे. त्यामध्ये मी मका, कापूस, तूर, बाजरी, सोयाबीन, डाळींब अशी पिके घेत असतो. मी यावर्षी २५ एकर कापूस लागवड केली. त्यामधील ७ पॅकेटची कापूस लागवडीसाठी मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी श्री. अभिजीत विजय प्रशाद (मो. ७३८५६४७३०४) यांनी त्यांचे मार्गदर्शनानुसार शेती करायला सांगितले. मी त्यांच्या सांगण्यानुसार जर्मिनेटर + कॉटन थ्राईवर + क्रॉपशाईनर तिन्ही औषधांचे स्प्रे घेतले. तर कपाशीची वाढ निरोगी होऊन कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव कपाशीवर झाला नाही.

माझा हा प्लॉट सोडून बाकीच्या कपाशीमध्ये थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या प्रतिनिधींच्या मार्गदर्शनानुसार सप्तामृत फवारण्या केल्या तर शेतामध्ये थ्रीप्स जाणवलाच नाही. हा प्रात्यक्षिक अनुभव माझ्या भोवतालचे लोकांनासुद्धा जाणवला. मग मी नेहमीप्रमाणे रासायनिक खत न टाकता कल्पतरू सेंद्रिय खत एकूण १२ बॅग लागवडीनंतर ४५ दिवसांनी टाकले. त्यामुळे जमिनीमध्ये जारवा कायम राहिला. माझ्या नेहमीच्या अनुभवात व यावर्षीच्या अनुभवामध्ये फार मोठी तफावत होती. आज रोजी मला एकरी १५ क्विंटल कापूस उत्पन्न मिळाले. असून मी फरदडसाठी सुद्धा प्रतिनिधींच्या मार्गदर्शनानुसार औषधे फवारली आहेत. तर माझ्या अंदाजानुसार मला आतापर्यंत फरदडपासून सरासरी एकरी २ क्विंटल कापूस निघाला असून अजून २ - ३ क्विंटल कापूस निघेल.