क्लासवन निवृत्ती अगोदर फळशेतीचे नियोजन करून चिकू, आंबा, पेरू, लिंबाचे विक्रमी दर्जेदार उत्पादन व भावही अधिक !

श्री. प्रकाश यशवंतराव भोसले, (गृह खात्यातील राजपत्रीत वर्ग - १ पदावरून सेवानिवृत्ती)
मु. पो. शेडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर.
मोबा. ९४२२३१३११३



मी शासनाच्या सेवेमध्ये असताना डॉ. बावसकर तंत्रज्ञानाने गावी चिकू, केशर आंबा, पेरू, लिंबू चा बागाची लागवड ५ - ६ वर्षापुर्वी (जून २००५) केलेली आहे. सुट्टीच्या दिवशी शेतीवर जाऊन डॉ. बावसकर सरांच्या सल्ल्यानुसार तंत्रज्ञानाचा वापर मजुरांमार्फत करत असे. यामध्ये शेतीकडे नोकरी करत लक्ष देत असल्याने तंत्रज्ञानाचा पुरेपुर अवलंब करणे अवघड जात असे. तरीही त्यापासून आम्हास या तंत्रज्ञानाचा जेव्हा - जेव्हा वापर केला. तेव्हा त्याचे अतिशय सकारात्मक रिझल्ट अनुभवायला मिळाले.

५ - ६ वर्षानंतर आपण सेवा निवृत्त होणार आहे, असे माहीत असल्याने तोपर्यंत कमी वेळ लक्ष देऊनही या फळबागा बहार धरण्याइतपत डॉ. बावसकर तंत्रज्ञान व सल्ल्याप्रमाणे वाढवून घेतल्या. गेल्यावर्षी मी निवृत्त झाल्यानंतर पुर्णवेळ देऊ लागलो.

जून २००५ मध्ये अडीच एकरमध्ये ३३' x ३३' वर लावलेल्या कालीपत्ती चिकूची १२५ झाडे आता १० - १२ फुट उंचीची व चारी बाजूस फांद्या ८ ते १० फूट लांबीच्या असा घेर तयार झाला आहे. या चिकूला फुलकळी लागतेवेळी सप्तामृत औषधांची पहिली फवारणी केली, तर फुलगळ झाली नाही. पाने काहीशी निस्तेज होती ती टवटवीत होऊन पानांना काळोखी आली. झाडे सशक्त वाटू लागली. पुढे फळे सुपारीच्या आकाराची झाल्यानंतर सप्तामृताची दुसरी फवारणी केली, तर फळांचे पोषण अतिशय समाधानकारक झाले आहे. २० मार्च २०११ ला पहिला तोडा केला, तर १२५ झाडांपासून २४ क्रेट माल निघाला. त्यातील २२ क्रट फळे एकदम मोठ्या आकाराची होती. एका किलोत ८ ते १० च फळे बसत. २ क्रेट माल मध्यम प्रतिचा होता. फवारण्यांमुळे पानाला, फळांना आकर्षक चकाकी आहे. या फळांची विक्री गुलटेकडी, पुणे मार्केटला केली असता, तेथे १८ ते २० रू. किलो भाव मिळाला.

दुसरा तोडा ६ एप्रिलला करणार आहे. झाडाच्या सर्व फांद्या फळांनी लगडलेल्या आहेत. फुले लागतच आहेत. झाडावर फळे मोजता न येण्याएवढी आहेत. याला सप्तामृताच्या २ फवारण्या, शेणखत प्रत्येक झाडास ५ किलो एवढाच वापर केला आहे. जमीन भारी काळी असून पाणी ठिबकने देतो. या चिकूत सोयाबीन, हरभरा अशी आंतरपिकेही घेतो. हरभरा २ - ३ दिवसांपुर्वीच काढला.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे मोहोरगळ नाही केशरची फळे मोठी व अधिक

केशर आंब्याची ५० झाडे चिकूबरोबरचीच १८' x १८' वर लावलेली आहेत. त्याची गेल्यावर्षी वागणी ५०० फळे मिळाली. चालूवर्षी भरपूर फळे लागलेली आहेत. याला मोहोर लागल्यापासून कैरी धरेपर्यंत डॉ.बावसकर तंत्रज्ञानाच्या नियमित फवारण्या घेतल्याने मोहोर गळ झाली नाही. फलधारणा चांगल्याप्रकारे होऊन कैऱ्यांचे पोषण झाले. सध्या कैऱ्या २५० ते ३०० ग्रॅम वजनाच्या आहेत. हा आंबा मे च्या तिसऱ्या - चौथ्या आठवड्यात काढणीस येईल. झाडांवर १०० ते १२५ फळे असून झाडे १५ फूट उंचीची घेरदार आहेत.

लखनौ ४९ (पेरू) १ किलोत ३ ते ४

लखनौ ४९ पेरूची ५० झाडे २०' x २० ' वर तांबट पोयटायुक्त जमिनीत जून २००६ मध्ये लावलेली आहेत. यावेळी सप्तामृताच्या फवारणीनंतर खूप फुले आली आहेत. एका किलोत ३ ते ४ च फळे बसतात. याचा पुणे मार्केटला असा अनुभव आला की, गाळ्यावर गिऱ्हाईक १० शेतकऱ्यांच्या मालामध्ये आपल्या मालास प्रथम क्रमांकाची पसंती देत होते. त्यामुळे बाजारभावही वाढून मिळत होता.

लिंबास स्थानिक मार्केटमध्ये भाव ४० ते ५० रू. किलो

साईसरबती कागदी लिंबाचे (जुलै २००५ मधील) उत्पादन चालू आहे. चालू बहाराचा गेल्या महिन्यात १५० किलो माल तीन तोड्याचा मिळाला आहे. त्याची स्थानिक विक्री करतो. एका किलोत १४ - १५ फळे बसतात. एवढे मोठे फळ आहे. ४० ते ४५ रू. किलो भाव मिळतो. याला सप्तामृताच्या २ फवारण्या वरीलप्रमाणे केल्या आहेत.

२ वर्षाची बाग उंची ५' - ६ लोक म्हणतात, बाग ३।। ते ४ वर्षाची !

नवीन लागवड साईसरबतीचे जून २००९ मधील आहे. २०' x २०' वर २०० झाडे आहेत. त्यांना जर्मिनेटरचे ड्रेंचिंग आणि सप्तामृताच्या वेळच्यावेळी फवारण्या करत असल्याने झाडे ५ - ६ फुट उंचीची झाली आहेत. पाहणारे म्हणतात, "ही बाग ३।। ते ४ वर्षाची असावी." झाडे सशक्त, फुटवे भरपूर, पाने हिरवीगार, चमकदार आहेत.