सर्वांचे केळीचे प्लॉट करप्याने गेले मी मात्र १० गुंठ्यात ३० हजार हातविक्रीने केले

श्री. प्रदिप जयसिंग गायकवाड,
मु.पो.ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.
मोबा.९७६७१३६७७३


ग्रँड नैन केळीची १० गुंठ्यामध्ये ७' x ५' वर लागवड केली आहे. जमीन चांगल्याप्रकारची नदीकाठची आहे. दर आठवड्याला पाटाने पाणी दिले जाते केळीचे कंद जर्मिनेटरमध्ये १ तास भिजवले होते. त्यासाठी २०० लि. पाण्यामध्ये २ लि. जर्मिनेटर घेतले होते. जर्मिनेटर चे प्रक्रियेमुळे कोंब तजेलदार व लवकर आठवड्यातच दिसले. नंतर एक महिन्याच्या अंतराने १५ लि. पाण्यामध्ये ७० मिली जर्मिनेटर घेऊन रोपांवरून ड्रेंचिंग (आळवणी) केले व २० ते २५ दिवसाच्या अंतराने सप्तामृताच्या फवारण्या केल्या.

मध्यंतरी आमच्या भागातील सर्वांचे केळीची प्लॉट करपा रोगाने खराब झाले होते. मात्र माझा प्लॉट या रोगाला बळी न पडता मी चांगल्याप्रकारे उत्पादन घेवू शकलो. बऱ्याच केळीच्या बाग रोगाने खराब झाल्याने उत्पादन घटले होते. त्यामुळे मार्केटमध्ये माल कमी असल्याने आम्हाला अधिक बाजारभार मिळाला. ही केळी व्यापाऱ्यांना न देता हात विक्री केली, तर १० गुंठ्यातील या केळीपासून आम्हाला ३० हजार रुपये मिळाले.