अर्धा सिझन संपल्यावरही डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून ५५ गुंठ्यात २८ ते ३० टन बटाटा, १ लाख ३० हजार

श्री. बाबुराव गोविंद गाडगे, मु. पो. निमगाव सावा, ता. जुन्नर, जि. पुणे.
मोबा. ९९६०५३३०३३


मी १८ जुलै २०११ रोजी ५५ गुंठे शेतात ८० किलो ताग पेरला व दीड महिन्याने सिंगल पलटी नांगराने गाडला. नंतर एका महिन्याने ट्रेक्टरने २ वेळा फणणी मारून चांगली योग्य प्रकारे मशागत केली.

नंतर १८ ऑक्टोबर २०११ रोजी २ फूट रुंदीची बैलाच्या सहाय्याने सरी पडून त्यात दीड एकराला दोन डंपर ट्रॉली कोंबडी खत आणून प्रत्येक सरीत टाकले. नंतर २० सें. मी. (८ इंच) अंतरावर पुखराज जातीचे बारीक गाठीचे बटाटा बेणे लागवड केली. बटाट्याला रासायनिक तसेच इतर कोणतीही खते वापरली नाहीत. त्याला सरीतून पाणी दिले. एका महिन्याने बैल नांगराच्या सहाय्याने प्रत्येक सरीला भर लावली.

नंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे नारायणगाव येथे सप्तामृत औषध व खताचे कृषी विज्ञान केंद्र आहे. मी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मला रासायनिक खते व औषधे न वापरण्याचा सल्ला दिला. त्याऐवजी सप्तामृत वापरण्याचे सांगून त्याबद्दल माहिती व इतरांचे अनुभव सांगितले. ते म्हणाले आम्ही सांगतो त्याप्रमाणे औषधे न्या व दोन वेळा फवारणी करा. पण मी त्यांना प्रथम माझ्या प्लॉटची पाहणी करायला सांगितले. कारण हवामानामुळे पाने वाकडी व अंकुचन पावली होती. तसेच करपा पण दिसत होता. त्यानंतर अभय औटी यांनी शेतावर येऊन सर्व प्लॉटची पाहणी केली. त्यांनी सांगितले मी सांगेल ते औषध फवारणी करा. करपा कंट्रोल होईल आणि पोटॅश दोन वेळा पाण्यातून सोडा, मला विश्वास बसत नव्हता. कारण अनेक दुकानदार खते, औषधे खपविण्यासाठी फार गोड बोलतात व पिकांचे नुकसान झाले की म्हणतात, हवामान बरोबर नव्हते. पण औटी यांनी सल्ला दिला की, " काका एक वेळेस औषधे वापरून पहा." त्यांनी दिलेल्या खात्रीनुसार मी डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरायचे ठरविले. त्यावरून जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. घेऊन गेलो. त्यातील जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनरच्या २ वेळा फवारण्या केल्या आणि पोटॅश २० लिटर सोबत न्युट्राटोन १ लि. २ वेळा पाण्यातून सोडले.

नंतर ५ जानेवारी २०१२ रोजी औटी व त्यांचे सहकारी यांचे हस्ते बटाटे काढणीस सुरुवात केली. त्यावेळेस प्रत्येक बटाटे २५० ते ४०० ग्रॅमचे निघाले असून ५५ गुंठ्यातील रोगग्रस्त अवस्थेतील बटाट्यास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी अर्ध्यावर वापरून २८ ते ३० टन एकूण उत्पन्न मिळाले. त्याचे १ लाख ३० हजार रू. झाले. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे व कल्पतरू खत सुरूवातीपासून वापरून माझी अपेक्षा एकरी ३५ टन उत्पादन काढण्याची आहे. तरी डॉ.बावसकर सरांना नम्र विनंती आमची ही यशोगाथा आम शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. यातून बटाटा उत्पादकांना ऊर्जा मिळेल. तेव्हा ती आपल्या कृषी विज्ञान मासिकातून प्रकाशित करावी.