यशस्वी कोथिंबीर (धना) लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर



महत्त्व : ज्याप्रमाणे मिठाविना आहार आळणी लागतो त्याचप्रमाणे स्वयंपाकातील भाजीचा कोथिंबीरीवीना स्वाद अधुरा राहतो. मोठमोठ्या हॉटेल्समधून, लग्न सराईत तसेच हातगाडीवाल्यांच्या भेळी व इतर खाद्यांमध्येदेखील स्वादासाठी कोथिंबीरीचा सर्रास व आवर्जुन उपयोग होताना दिसतो. हे महत्त्व झाले स्वादापुरते, परंतु प्रत्यक्ष कोथिंबीरीमध्ये 'अ' जीवनसत्व असून नेत्रविकारासाठी आहारामध्ये ह्या कोथिंबीरीचा नियमित उपयोग केल्यास दृष्टीदोष दूर होऊ शकतो. तसेच तुळशीचे बी (सब्जा), धने व खडीसाखर हे आदल्या रात्री छोट्याशा मातीच्या भांड्यात कपभर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवले व सकाळी हे पेय घेतले तर ज्याप्रमाणे उष्ण प्रकृतीच्या शरीरास (कडकी) ज्या ठिकाणी गुलकंद मिळत नाही त्याठिकाणी हा स्वस्त उपाय रामबाण ठरतो.

उन्हाळ्यात लागवड का करावा ? साधारण होळी किंवा शिमग्यापासून हवेतील उष्णता झपाट्याने वाढत जाते, पाऊस अवेळी, कमी होत असल्याकारणाने विहीरीचे पाणी अतिशय मर्यादित असते की, जे एरवी तीन महिन्याच्या वरील भाजीपाल्यास उपयोगी होत नाही. अशा वेळी कोथिंबीरीसारखे भाजीपाला पीक (फक्त एक महिन्याचे असल्याकारणाने) पाण्याच्या मोजक्या उपलब्धतेवर थोड्याशा अक्कलहुशारीने केल्यास भरपूर पैसे मिळू शकतात.

कोथिंबीरीचे अर्थशास्त्र : गेल्या १५ - २० वर्षाच्या मार्केटच्या अभ्यासावरून असे लक्षात आले की, उन्हाळी धना (कोथिंबीर) साधत नाही, कारण हवेतील उष्णतेमुळे उगवणाऱ्या धन्यामध्ये मर होण्याचे प्रमाण जास्त असते. पण लग्नसराईमध्ये व उन्हाळ्यामध्ये मागणी जास्त असते आणि म्हणून पंधरा मार्चपासून ते वीस जूनपर्यंत कोथिंबीरीचे भाव एक ते दोन रुपयांपासून दहा ते पंधरा रुपये प्रति गड्डी पर्यंत एवढे कडाडतात. तेव्हा सरासरी एक गुंड्यात एक हजार गड्डी कोथिंबीर मिळाल्यास सरासरी ५ रुपये प्रति गड्डी असा भाव धरल्यास एका गुंठ्यात एका महिन्यातच ५ हजार रुपये मिळतात.

कोथिंबीर लागवड केव्हा करावी ? : जुना धनाही उगवणीस उत्तम असतो. १७ मार्च ते १९ जूनपर्यंत दर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने २ ते ५ गुंठे कोथिंबीरीचे प्लॉट केल्यास २५ ते ३४ दिवसांनी कोथिंबीर काढणीस येते. अशी ६ ते १० वेळा काढणी करून व्यवस्थित नियोजन केले असता तीन महिन्यात एकरी ५० हजार ते १ लाख रुपये सहज होतात. किंबहुना अधिकच होतात.

जाती : १) गावरान किंवा वाई धना : हा धना करड्या रंगाचा, लंबाकृती आकाराचा असतो. ह्या धन्याच्या कोथिंबीरीचा स्वाद चांगला असतो. पानांचा आकार किंचीत पोपटी असून दातेरी कडा जास्त असतात. तथापि ह्या कोथिंबीरीची गड्डी पल्लेदार होऊ शकत नाही. दुसरा दोष म्हणजे पाने जांभळी तांबूस तपकिरी रंगाची जास्त प्रमाणात निघतात. तसेच ह्या कोथिंबीरीची काडी कडक असते.

२) बदामी धना :

ही जात खरी जळगाव भागातील आहे. म्हणून बाजारभाव सांगताना जळगाव धना असा नामोल्लेख करतात. हा धना आकाराने मोठा, गोलाकार असतो. कोथिंबीरीची गड्डी पल्लेदार असून १० ते १५ झाडांमध्येच गड्डी तयार होते. कारण ह्या कोथिंबीरीच्या झाडास फांद्या असतात आणि काडीदेखील रसाळ असते. पाने - मोठी, रुंद, जाड दाट व गर्द हिरवी असतात. त्यामुळे शेतकरी विक्रीच्या हिशोबाने हाच धना जास्त पसंत करतात. तथापि ह्या कोथिंबीरीचा स्वाद कमी असतो. मोठमोठ्या हॉटेल्समध्ये, लग्न समारंभामध्ये ह्या कोथिंबीरीला विशेष मागणी असल्यामुळे भावही चांगला मिळतो.

३) इंदोरी धना : ह्या जातीचे वैशिष्ट्ये म्हणजे हा धना बारीक, निमुळता असून बियांवर स्पष्ट शिरा (वाई धन्यापेक्षा) दिसतात. तसेच हा धना निस्तेज, पिवळसर रंगाचा स्पष्ट आकाराचा व अतिशय स्वाद्युक्त म्हणजे ह्या धन्याचा स्वाद १५ ते २० फुटावरून येतो. त्यामुळेच मसाल्यामध्ये, शहरवासियांमध्ये प्रचलित असून ह्या धन्याचे बी इतर बियांपेक्षा दुप्पट भावाने विकले जाते. म्हणून हे बी मसाल्याचा कुटीरोद्योग करणाऱ्यांनी जरूर वापरावे.

४) गौरी धना : ह्या जातीचे वैशिष्ट्ये म्हणजे ह्या धन्याची कोथिंबीर हिरवीगार, पाने मोठी असल्यामुळे गड्डी पालेदार दिसते. बाजारभाव पडलेले असल्यास ४ - ६ दिवस उशीरा काढणी केल्यासही फुल येत नाही.

धना पेरणीपुर्वीची प्रक्रिया : एक पोते धन्यासाठी (४० किलो) एक लिटर जर्मिनेटर + १०० लिटर पाणी घेऊन हे धने पोत्यामाध्येच वरील मिश्रणाच्या बॅरलमध्ये किंवा विहीरीजवळील हौदामध्ये (हाळ) १ ते २ रात्रभर भिजवून सावलीत सुकवून सपाट वाफ्यामध्ये फोकावे, म्हणजे उगवण लवकर होते. साधारण धना बाराव्या दिवशी उगवतो. परंतु वरील प्रक्रिया केल्यास आठव्या दिवशीच धना उगवून मर न होता उगवणारे कोंब हिरवेगार राहतात व जोमाने वाढतात.

धन्याचे मिश्रपीक करताना निरनिराळ्या पिकांमध्ये वारंवार धन्याचे पुंजके टाकतात, तिथे धना पिक दुय्यम पीक असते. कोबी, घेवडा कांदा यासारख्या अनेक पिकांमध्ये हे मिश्रपीक घेतले जाऊन मुख्य पिकांच्या निंदणी, खुरपणीचा खर्च या कोथिंबीरीच्या पिकांपून निघतो. अशी शेतकऱ्यांची धारणा आहे.

अधिक, दर्जेदार उत्पादन घेण्याकरिता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांच्या खालीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.

१) पहिली फवारणी : (धना उगवल्यानंतर ५ ते ८ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (धना लागल्यानंतर १२ ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ३५० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + राईपनर १०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (धना उगवल्यानंतर १८ ते २१ दिवसांनी) : थ्राईवर ५०० मिली.+ क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ १५० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (धना उगवल्यानंतर २५ ते २८ दिवसांनी) : जर्मिनेटर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + २०० लि.पाणी.

कोथिंबीर (धना) : थंडीत व उन्हाळ्यामध्ये धन रगडून पेरला तर उगवण हमखास होत नाही. मर होतात. तशा प्रकारचा धना/कोथिंबीरीच्या कड्या बारीक व कडक होते. खालची निम्मी पाने लाल विटकरी, पिवळसर रंगाची होऊन झाडांचा अर्धा भाग वाया जातो. अशा कोथिंबीरीची एक गड्डी साधारण ६० ते ८० रोपांची होते. पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान होते. तेव्हा धना न रगडता जर्मिनेटर च्या द्रावणामध्ये एक रात्र भिजवावे. (१०० लि. पाणी + जर्मिनेटर १ लि. + १ पोते धना) भिजवताना पोते तरंगु नये म्हणून पोत्यावर जास्त वजनाचा दगड ठेवावा. बॅरलमधून दुसऱ्या दिवशी पोते काढावे. एक दिवस एका कोपऱ्यात ठेऊन तिसऱ्या दिवशी पुंजके लावावे किंवा फोकावे. जमीन वाफश्यावर आल्यानंतर वाफे किंवा सऱ्या बांधाव्यात. धना उगवून येईपर्यंत पाणी दिवस कधीही देऊ नये. कारण थंडीत व उष्णतेत धना उगवणीस सर्रास मार खातो.

गेल्या पाच वर्षापासून मान्सून (खरीप) १ महिना पुढे गेल्याने पावसाळा ऑगस्टमध्ये सुर होतो. म्हणजे जुलै अखेरपर्यंत जरी कोथिंबीर (धना) लावत राहिलो तरी ऑगस्ट अखेरीस गेल्या दोन वर्षात कोथिंबीरीचे १० रू. गड्डी असे ठोक भाव टिकून होते. म्हणजे १७ मार्चपासून आता १९ मे पर्यंतच नव्हे तर १९ जून व नशिबावर हवाला ठेऊन १० जुलैपर्यंत टप्प्या - टप्प्याने लागण केली तर हमखास पैसे होतात हे लक्षात घ्यावे. मार्चपासून कोथिंबीरीची गड्डी ४ ते ५ रुपयांपासून वाढत जाऊन उष्णता वाढून पाणी जसे कमी होत जाते तसे कोथिंबीरी चे भाव १० रे १५ रुपये गड्डीपासून ते २५ रू. गड्डीपर्यंत भडकतात तीच गत घेवड्याचीही आहे.

कोथिंबीरीचे क्रांतीकारक अर्थशास्त्र : मे महिन्याचे (म्हणजे ४२ डी. सें.) दिवस द्राक्षाच्या एप्रिल छाटणीनंतर वरंब्याचे बुडाशी जर्मिनेटरची प्रक्रिया करून ४ - ४ धनेबरोबर लावणे. जर्मिनेटरच्या द्रावणामध्ये (१०० लि. पाणी + जर्मिनेटर १ लि. ) धान्याचे पोते रात्रभर भिजवून ठेवले व नंतर काढले असता तिसऱ्या दिवशी कोंब दिसतील पंचामृताची ५,११,१६ व्या दिवशी फवारणी केली असता कोथिंबीर उगवून आल्यावर २१ दिवसात नव्हे तर १६ व्या दिवशीच मार्केटला येते.

सर्वसाधारणपणे धना पेरणीपुर्वी बुटाने रगडून घेतात. परंतु त्यामुळे थंडीत व उन्हाळ्यात मर होतेच तेव्हा धना न रगडता तसाच पोत्यामध्ये भरून जर्मिनेटरच्या द्रावणामध्ये (बॅरलमध्ये पोते तरंगु नये म्हणून पोत्यावर मोठा दगड वजन म्हणून वापरावा) रात्रभर भिजवून पोते तसेच बंद ठेवले असता दुसऱ्या दिवशी त्यास बारीक कोंब आलेले असतात. आलेल्या कोंबातून पेरणीनंतर जुडगे निघतात. हे जुडगे जोमदार हिरवेगार मिळून उत्पन्नात वाढ होते. असा प्रयोग करून पहावा. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वरीलप्रमाणे कोथिंबीरीकरिता वापर केल्याने ४० ते ४२ डी. सें. तापमान असताना देखील कोथिंबीर तेलात बुडविल्यासारखी चमकत होती. असा श्री. पाटील जि. अमरावती यांचा अनुभव आहे.

काढणी व उत्पादन : साधारण एका गुंठ्यामध्ये हाताच्या मुठीएवढ्या आकाराच्या ५०० ते ६०० गड्ड्या सहज तयार होऊन एकरी १ लाख रुपये मिळतात. एवढे जास्त व ताबडतोब उत्पन्न देणाऱ्या कोथिंबीरीसारख्या दुसऱ्या पिकांची शेतीच्या इतिहासामध्ये आजपर्यंत तरी नोंद नाही.