मेथीची मर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आटोक्यात

श्री. आबासाहेब नामदेव ढोकले,
मु. पो. करंदी, ता. शिरूर, जि. पुणे


३० किलो मेथी बी टाकले होते. बियाची उगवण ७० ते ८०% झाली. उगवून आल्यावर आठावाद्याने मेथीची मर व्हायला लागली. त्यावर रासायनिक औषधांची फवारणी केली. तरी काहीच फरक पडला नाही. मर चालूच होती.

मी २ वर्षापुर्वी कांद्याला जास्त करपा पडला होता तर त्याला आमचे पाहुणे ढवळे यांनी या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांची माहिती सांगितली व पत्ता दिला. त्यावरून ५०० मिली सप्तामृत औषधे नेऊन त्यांची कांद्यावर फवारणी केली. तर पाऊस जास्त असूनही कांदा काढणीपर्यंत पिकावर कुठलाच वाईट परिणाम झाला नाही. या अनुभवावरून मी मेठीसाठी जर्मिनेटर, थ्राईवर या औषधांची फवारणी केली तर १००% मर आटोक्यात येऊन वाढ चालू झाली. शिवाय मेथीला चकाकी आली.

मेथी २४ दिवसात काढणीस आली. ६५०० गड्डी निघाली. गड्डी मोठी होती. मात्र बाजारात आवक जास्तच असल्याने भाव कमी २५० रू. शेकड्याने गेली. तर भाजीची चकाकी व गड्डी रसरशीत पाहून दलाल आमचे प्लॉटवर भेटीसाठी आले होते. त्याचवेळेस इतरांची १०० ते १२५ रू. शेकडा दराने भाजी जात होती. अशा परिस्थितीत आमच्या मेथीला २५० रू. शेकडा भाव मिळाला. शिवाय आपली गड्डी कमी काडीत तयार झाल्याने ३० किलो मेठीपासून मोठी ६५० गड्डी निघाली. त्यामुळे भाव सगळीकडेच कमी झाले तरी माल भरपूर निघाल्याने आणि इतरांपेक्षा जादा भाव मिळाल्याने १६ हजार रू. २४ दिवासात झाले. आत नवीन २५ -३० किलो मेथीची लागवड करणार आहे. त्यासाठी जर्मिनेटर ५०० मिली घेऊन जात आहे.