३० गुंठे कोथिंबीर ३५ दिवसात निव्वळ नफा ४३ हजार

श्री. किशोर काळूराम बोंबले,
मु. पो. रेताळे, ता. खेड, जि. पुणे.
मोबा.९५६८८७५१३



चालूवर्षी फेब्रुवारी अखेरीस आंध्रा गोल्ड धना ४८ किलो बी ३० गुंठ्यामध्ये टाकले होते. धना टाकताना त्याला कल्पतरू सेंद्रिय खताची १ गोणी दिली होती. नंतर धना १८ दिवसांना असताना युरीयाची १ गोणी दिली. याचा अवस्थेत कोथिंबीर पिवळी पडली होती. म्हणून जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, औषधांची फवारणी घेतली. ३ पंपामध्ये संपुर्ण क्षेत्रावर फवारणी झाली. विशेष म्हणजे ३ र्‍या दिवशी कोथिंबीर हिरवीगार झाली. पाने रुंद, काडी जाड रसरशीत तयार झाली. एवढ्यावरच ३५ व्या दिवशी कोथिंबीर काढली.

३० गुंठ्यातून ५५०० गड्डी निघाली. त्यातील निम्मी कोथिंबीर खेड मार्केटला १२०० रू. शेकडा या एका नंबर भावाने विकली. नंतर राहिलेली कोथिंबीर पुणे मार्केटला विकली. तेथे देखील १ नंबर भावाने कोथिंबीर गेली. त्यावेळी भाव कमी होते तरी आमच्या कोथिंबीरीस ८०० रू. / शेकडा भाव मिळाला.

या कोथिंबीरीपासून दिड महिन्याच्या आत ३० गुंठ्यातून ४९ हजार रू. उत्पन्न मिळाले. याला एकूण खर्च (धना बी ३५०० रू. युरीया ३५० रू., कल्पतरू ६५० रू. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे २१० रू. मजुरी ६०० रू. असा) ५३१० रू. खर्च जात ४३ हजार रू. निव्वळ नफा दिड महिन्यात ३० गुंठ्यातून झाला. या अनुभवावरून पुन्हा ७ एप्रिल २०१३ रोजी ४० किलो धना टाकला आहे. तो बरोबर अक्षय्य तृतीयेला निघेल.

५० गुंठे बटाटा १९ कट्टे बेणे २०० कट्टे उत्पादन ९२ हजार

डॉ.बावसकर तंत्रज्ञानाची पहिल्यांदा कृषी प्रदर्शनातून माहिती मिळाली. गेल्या हंगामातील ५० गुंठे बटाट्यावर करपा पडला होता तेव्हा पुणे ऑफिसवरून थ्राईवर, क्रॉंपशाईनर आणि हार्मोनी नेऊन फवारले. तर ८०% फरक पडला. याला रासायनिक औषधांच्या २ फवारण्या आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची एक अशा तीन फवारण्या केल्या. एकूण ५० गुंठ्यासाठी १९ कट्टे (५० किलोचे) बेणे लावले होते. त्यापासून २०० कट्टे उत्पादन मिळाले. त्यापासून ९२ हजार रू. झाले. या अनुभवावरूनच कोथिंबीरीसाठी चालू हंगामात डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरता आहे.