डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने 'विक्रमी दर्जेदार उत्पादन देणारा कापूस' पुस्तकाची पाचवी आवृत्ती प्रकाशित

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


आंतरराष्ट्रीय स्तरावरील कापसाचे घटते उत्पादन व वाढती मागणीमुळे कापसाचे वाढते बाजारभाव लक्षात घेता शेतकर्‍यांनी पाण्याच्या टंचाईवार देखील मात करून ठिबकचा अवलंब करून कापसाच्या लागवडी वाढत आहेत. अशा लागवडींना डॉ.बावसकर तंत्रज्ञानाची साथ लाभल्याने उत्पादन व दर्जात वाढ झाल्याचे महाराष्ट्रातील अनेक शेतकर्‍यांने अनुभवले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अवध्य सात वर्षामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने विक्रमी दर्जेदार उत्पादन देणारा कापूस पुस्तकाच्या चार आवृत्त्या संपून नुकतीच पाचवी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. या आवृत्तीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बागायती, जिरायती कमी पाण्यावर कापसाचे किड रोगमुक्त अधिक उत्पादन कसे घ्यावे, त्याचा दर्जा कसा वाढवावा या संबंधी सविस्तर विवेचन केलेले असून यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कापूस उत्पादन करणार्‍या भागातील शेतकर्‍यांची डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दर्जेदार उत्पादन घेतले आहे. त्यांच्या यशोगाथा या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत.

राजस्थान सारख्या वाळवंटी भागात कमी पाण्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने अनउपजाऊ (पडीक) अर्धा एकर जमिनीतून १४ क्विंटल उत्पादन घेतल्याचे उदाहरण आपणास निश्चितच प्रेरणादायक ठरेल. अशा विविध विषयांच्या उपांगांची माहिती या पुस्तकामध्ये मार्गदर्शक म्हणून दिली आहे. या पुस्तकाची किंमत ५० रू. असून ते सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना, तंत्रज्ञांन, विकास अधिकार्‍यांना, शास्त्रज्ञांन, नियोजनकर्त्यांना, स्पर्धा परिक्षेत भाग घेणार्‍या विद्यार्थ्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.