कॉलेज करता - करता फायदेशीर शेती करतो

श्री. सागर महावीर पाटील,
मु.पो. वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर - ४१६१२२.
मोबा. ९५४५०४७४४९


मी सागर पाटील एस. वाय. बी. ए. मध्ये शिकत आहे. घरची शेती कमी असल्या कारणांने आम्ही प्रत्येक वर्षी तरकारी पिकेच घेतो. त्यामुळे चार पैसे राहतात. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात कोथिंबीरीला दर चांगला मिळतो. म्हणून ह्यावर्षीही कोथिंबीरीचे पीक घेण्याचे ठरविले.

यासाठी १० किलो धने आणले व ते धने फोडून जर्मिनेटरच्या द्रावणामध्ये भिजत घालून दुसऱ्या दिवशी (३ फेब्रुवारी २०१५) सकाळी धने सावलीत सुकवून घेतले. नंतर ते धने शेतात पाणी देवून झाल्यावर फेकून दिले, जर्मिनेटरच्या वापरामुळे धन्यांना पाचव्या दिवशी कोंब आले, शिवाय जर्मिनेटरमुळे पिकाची उगवण क्षमताही जवळ - जवळ १००% पर्यंत झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर जर्मिनेटर, क्रॉपशाईनर, दोन स्प्रे घेतले, ह्या औषधांचे प्रमाण जागृती अॅग्रो हेले येथून घेतले होते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे कोथिंबीरीस फुटवे निघून पालेदार वाढ होवून हिरवीगार दिसत होती. ही कोथिंबीर ऐन यात्रेच्या वेळेस काढणीस आली. कोथिंबीरीला शेकडा ५०० रू. दर चालू आहे. मी स्वत:च कोथिंबीर बाजारात विकतो.

या अनुभवातून मी प्रत्येक पिकास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्याचे ठरविले आहे व पुढील वेळेस 'सिद्धीविनायक' शेवगाही लावणार आहे. कारण शेवगा १० गुंठ्यात घेवून त्यात आतील जागेत आंतरपीक म्हणून भाजीपाला घेता येतो. अशा पद्धतीने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने उत्पन्नाचा दुहेरी मार्ग निर्माण करून दिल्याने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे मी आभार मानतो.