सोनचाफ्याच्या झाडास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

श्री. रोहन दुगाणे,
मु.पो. खडकवासला (नांदेड), ता. हवेली, जि. पुणे.
मोबा. ९४०४६८३०२१


आम्ही सोनचाफ्याची २०० झाडे ३ वर्षापुर्वी लावली आहेत. दापोली कृषी विद्यापीठातून १०० रू. प्रमाणे रोपे आणली होती. जमीन मुरमाड प्रतीची आहे. लागवड २० x २० फुटावर केली आहे. आम्ही सोनचाफ्याची छाटणी करीत नाही. पाणी साधारण ७ ते ८ दिवसाला देतो. आमची फुले दिड वर्षात चालू झाली. झाडांना ५ - ६ फुटवे आहेत. आमचा अनुभव असा आहे की फुले ही वर्षातून २ वेळा लागतात. साधारण फेब्रुवारीत फुले सुरू होतात. ती मे पर्यंत चालतात. नंतर पुन्हा नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये फुले मिळतात. त्यांनतर जानेवारी माल कमी होतो. सध्या १० फुलांची पुडी ४ - ५ रू. ला जात आहे.

शेवाळवाडीचे आमचे पाहुणे हेमंत भगत (मो.९३२५३०२०२०) यांनी मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की ह्या औषधांबद्दलचा माझा २० वर्षाचा अनुभव आहे. औषधे खात्रीशीर असून १००% उत्पादन व फुलांच्या दर्जात वाढ होईल. यावरुन (५ एप्रिल २०१५) प्रथमच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची सप्तामृत औषधे फुटवा, कळ्या व फुलांचा दर्जा वाढीसाठी घेऊन जात आहे.