डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीने वेल सुकण्याचा प्रादुर्भाव टळून १ एकर कलिंगड ३ महिन्यात निव्वळ नफा ५० हजार

श्री. प्रविण कदम,
मु.पो. चालगणी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ,
मो. ९८८१८२४५६५



माझ्याकडे वडीलोपार्जीत ८ एकर जमीन आहे. दरवर्षी मी डिसेंबर - जानेवारी मध्ये कलिंगडाची लागवड करत होतो. यावर्षी आमच्या भागातील डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. सतिश धवणे (मो. ९४२३६६२६५१) हे मला भेटले, त्यांची मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीबद्दल माहिती दिली व मी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन १ एकरावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर सुरू केला. सुरुवातीस जर्मिनेटरची बिजप्रक्रिया केली असता बियांची उगवण नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात झाली व ५ व्या दिवशी रोपे दिसायला सुरुवात झाली. नंतर १५ दिवसांनी प्रिझम १ लि. व जर्मिनेटर १ लि./एकरी याप्रमाणे मी ड्रिपद्वारे आळवणी केली तर वेलांची एकसमान वाढ होऊन वेळ निरोगी दिसत होते. तसेच १५ दिवसांनी एकरी ५० किलो व गुंडी धरतेळेस ५० किलो याप्रमाणे कल्पतरू खताची मात्रा दिली. या व्यतिरित कुठल्याही खताची मात्रा न देता डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीचे शेड्युलप्रमाणे फवारण्या केल्या.

माझ्या भागात गेल्या वर्षापासून २ किलोचे फळ झाले की वेळी सुकायला सुरुवात होत होती. अशा अवस्थेतून पीक पुन्हा सुधारत नव्हते. लोकांनी टरबूजाच्या (कलिंगडाच्या) बागा सोडून दिल्या. मी यावर्षी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केल्याने वेली सुकण्याचा प्रकार यावर्षी घडला नाही, उलट उत्पादनात त्यापैकी १३ टन माल व्यापाऱ्याला ६ रू. किलो प्रमाणे विकला व २ टन माल गावातील लोकल व्यापाऱ्यांना दिला. फळाची साईज जवळपास ५.५ किलो ते ७ किलो होती. ३ महिन्यात खर्च वजा जाता ५० हजार रुपये निव्वळ नफा या १ एकर कलिंगडापासून शिल्लक राहिला आहे.