डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने लिंबाची बाग सुधारली

श्री. कमलाकर भगवान मुंडे,
मु.चुकार पिंपरी, पो.नकोटा, ता. सोनपेठ, जि.परभणी.
मो. ७७०९५०६०२९


आमच्याकडे चुकार पिंपरी येथे कागदी लिंबाचा १।। एकर प्लॉट आहे. लिंबोनीवर खोडावरील व पानावरील मिलीबग ह्या किडीचा प्रादुर्भाव झाला होता. साधारण याचे ८०% प्रमाण होते. त्यावर मी एकटरा व प्राइड ही औषधे फवारूनदेखील ही कीड आटोक्यात आली नाही. नंतर काही दिवसांनी तिचे प्रमाण वाढले व मी वैतागूण प्लॉट काढण्याचा निर्णय घेतला. नंतर माझी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी यांचे प्रतिनिधी फिरोज सय्यद (मो. ९१६८२१३७६) यांची भेट झाली. मी हा प्लॉट त्यांना दाखवला व त्यांनी मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, स्प्लेंडर व बाहेरचे किटकनाशक पेन्टाटोडोर फवारण्यासाठी दिले. मी ती औषधे फवारली असता चौथ्या ते पाचव्या दिवशी ६० ते ७०% रिझल्ट दिसून आला व माझी बाग डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुले किडीपासून वाचली. धनलक्ष्मी कृषी केंद्र, सोनपेठ येथून फवारणीसाठी सप्तामृत औषधे व जर्मिनेटर ड्रेंचिंगसाठी घेतो. जर्मिनेटरमुळे व सप्तामृतमुळे बागेची फुट वाढून पानांची कॅनॉपी सुधारली. आता बहार मिळण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या चालू आहेत.

आता मी सर्व पिकांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार आहे व दुसऱ्या शेतकऱ्यांना पण मी सांगु इच्छीतो की एकवेळ अवश्य डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरा.