नरखेडच्या बाजारात संत्र्याचा २१ हजार रू./टन भाव असताना आम्हास मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे २५ हजार रू./टन

श्री. विजय आप्पाजी घोडे,
मु.पो. नरखडे, ता. नरखेड, जि. नागपूर - ४४१३०४.
मो. ७७१९८०३०५८


मी एकदा आमचे मित्र श्री. ज्ञानेश्वर बांदरे यांच्या शेतीमध्ये कामासाठी गेलो होतो. या आधी पण मी त्यांची संत्राची बाग पाहिली होती, परंतु यावेळी मात्र बाग, एकदम आकर्षक वाटत होती. बहार खुप लागला होता. त्यांच्या परिसरात कोणत्याही शेतकऱ्याची इतकी छान बाग दिसत नव्हती. मग मी त्यांना विचारले, तुमची बाग इतकी छान फुटलेली आणि फुटवे व पत्ती एकदम हिरवीकच्च भरपूर प्रमाणात आहे, याचे रहस्य काय? तेव्हा त्यांनी मला सांगितले, "मी यावर्षी संत्रा फुटीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर व प्रिझम वापरले आहे. त्यामुळे माझ्या संत्रा बागेची फुट तर झालीच शिवाय झाडाची क्वालिटीपण सुधारली. मी संपूर्ण स्प्रे डॉ.बावसकर तंत्रज्ञानानुसार करत आहे. तसेच कपाशीवर पण हे तंत्रज्ञाना वापरतो ".

त्यांनी मला आपल्या कंपनीचे प्रतिनिधी श्री. सागर रेवसकर यांच्याशी संपर्क करून दिला व लगेच दुसऱ्या दिवशी रेवसकर माझ्या शेतावर आले. माझ्याकडे एकूण १० एकर शेती असून ३ एकरमध्ये ८ वर्षापूर्वी १५' x १५' वर संत्र्याची झाडे लावलेली आहेत. या बागेचा मृग बहार धरला होता, मात्र झाडांची वाढ व पत्ती खुपच कमी असल्याने झाडे निस्तेज दिसत होती. बाग फारच कमी फुटला होता. त्यामुळे झाडावर १० ते १५ % च फळे लागली होती. मग ऑक्टोबरमध्ये मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती मिळाल्यावर रेवसकरांच्या सल्ल्यानुसार (मो. ८६००२९१२०१) फवारण्या करू लागलो. त्यामुळे फळांचे पोषण होऊन आकार व वजनात वाढ झाली. सालीला आकर्षक चमक आली. खरी कमाल तर तेव्हा झाली जेव्हा मी ही संत्रा नरखेडच्या मंडीमध्ये (मार्केटमध्ये) विकण्यास नेली तेव्हा भरपुर प्रमाणात इतर शेतकऱ्यांचाही माल विक्रीस आला होता. मात्र आमचा संत्रा इतर शेतकऱ्यांनी पाहिल्यावर ते म्हणू लागले. तुमचा संत्र आकाराने एवढा मोठा, एकसारखा, आकर्षक खुपच चांगला आहे. मंडीमध्ये आमच्या संत्र्याचा जेव्हा लिलाव सुरू झाला तेव्हा बाकीच्या शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त २१ हजार रू./टनाने संत्रा विकेलेले असताना आमचा माल मात्र २५ हजार रू./टनाने विकला गेला. परंतु सुरुवातीस बहार कमी फुटल्याने ३ एकरात माल कमी निघाला, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे मात्र फळांचा आकार व दर्जा सुधारल्याने बाजारभावाच्या बाबतीत हा माझ्यासाठी मीठा चमत्कारच घडला. कारण यापुर्वी आम्हाला सर्वसाधारणच भाव मिळत होता.