पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर



पारंपारिक शेती न परवडणारी झाली आहे. सधन (Intensive) व व्यापारी शेती, उत्पादन व त्यासाठी झालेला खर्च याची तोंड मिळवणी करता करता शेतकऱ्यांना नाकीनऊ आले आहे. ऊस बागायती व ऊस कारखानदारीने गेल्या ३० - ३५ वर्षाचा आढावा घेतल्यास ती तोट्यातच आल्याचे प्रत्यक्षात घडत आहे. विकासाच्या मृगजळाने शेतकऱ्यांची तहान ऊस शेती व कारखानदारीने भागवली नाही. हे कटू सत्य आहे आणि पाणी जास्त दिल्याने ऊसाखालील जमिनी खराब झाल्या आहेत. पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने निसर्ग कोपला आहे. गेल्या ५ वर्षांपासून पर्जन्यमानामध्ये सतत महाराष्ट्राच्या विविध भागात अनियमितपणा व पर्जन्यमान कमी असे सातत्याने अनुभवास येत आहे. त्यामुळे पाण्याची पातळी अपेक्षेपेक्षा अधिक खोल गेलेली आहे. महाराष्ट्र हा दुष्काळाच्या छायेत गेल्या ५ वर्षापासून पर्जन्यमानामध्ये सतत महाराष्ट्राच्या विविध भागात अनियमितपणा व पर्जन्यमान कमी असे सातत्याने अनुभवास येत आहे. त्यामुळे पाण्याची पातळी अपेक्षेपेक्षा अधिक खोल गेलेली आहे. महाराष्ट्र हा दुष्काळाच्या छायेत गेल्या ५ वर्षापासून पर्जन्यमानामध्ये सतत महाराष्ट्राच्या विविध भागात अनियमितपणा व पर्जन्यमान कमी असे सातत्याने अनुभवास येत आहे. त्यामुळे पाण्याची पातळी अपेक्षेपेक्षा अधिक खोल गेलेली आहे. त्यामानाने देशाच्या इतर राज्यातील परिस्थिती बऱ्यापैकी आहे.

वरील सर्व गोष्टींची साकल्ल्याने विचार करून गेले एक दशक आम्ही पर्यायी पिकाचा शोध घेत होतो. १० वर्षाहून अधिक काळात बिहारपासून ते गुजरातपर्यंत आणि राजस्थानपासून कर्नाटकपर्यंत देशभर शेवगा या पिकावर प्रयोग केले. असे २००० हून अधिक यशस्वी मॉडेल देशभर कार्यरत आहेत. या संशोधन व अनेक ठिकाणी केलेल्या प्रयोगातून आम्ही 'सिद्धीविनायक' मोरिंगा ही शेवग्याची सेंद्रिय जात विकसीत केली असून पडीक व हलक्या, वरकस जमिनीमध्ये, कमी पाण्यामध्ये, कमी पैशामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा (डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा) वापर करून अनेक शेतकऱ्यांनी देशभर बऱ्यापैकी उत्पादन घेतले आहे. केवळ १५ महिन्यामध्ये दोनदा झाडांना बहार येऊन एकरी ७५ हजार ते १ लाख रुपये निव्वळ शेवग्याच्या शेंगापासून उत्पादन मिळविले आहे. सुरुवातीच्या काळात पालेभाज्याचे आंतरपीक अथवा २ ते ३ महिन्यात येणारे फळभाजीचे पीक यशस्वीपणे घेता येते असे प्रयोगांती आढळून आले आहे.

एवढ्या कमी वेळामध्ये, कमी खर्चात शेतकऱ्यांना एकरी ७५ हजारापासून १ लाख रुपये व आंतरपिकाचे २५ हजारापासून ५० हजारापर्यंत उत्पादन मिळवून देणारे पीक जगाच्या इतिहासात अजून आढळले नाही. "सिद्धीविनायक' शेवगा हा कल्पवृक्ष आहे हे सिद्ध केले आहे. हा सर्व खटाटोप करण्यामागे हेतू हाच आहे की, जगभरचा शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि त्याला कर्जाच्या विळख्यातून, नैराश्यातून बाहेर काढून आत्महत्येपासून परावृत्त करणारे हे तिसऱ्या जगाचे आदर्श पीक आहे. म्हणून जसे अमेरिकन नाण्यावर We Trust In God असे अमेरिकन सरकारने न लिहिता In God We Trust असे संबोधले आहे. हे जेव्हा माझ्या वाचण्यात आले त्याचे अगोदर १०० मॉडेल्सचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले की, "शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेवगा थांबवेल" असे आम्ही संबोधीत न करता "शेवगा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवेल" हे आम्ही प्रत्यक्ष सिद्ध केले आहे. यामध्ये शेवग्याला आम्ही "कर्ता" केला आहे.

अशा रितीने आजपर्यंतच्या संशोधन व विकासाच्या अनुभवातून असे लक्षात येते की, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन नवीन प्रयोग करून 'सिद्धीविनायक' मोरिंगाची लागवड केल्यास शेतकऱ्यांच्या दुख:श्रुंचे आनंदाश्रुत रूपांतर केले जाईल. हा दुर्गम आत्मविश्वास आहे. आपण केलेले प्रयोग व निष्कर्ष आमचे कृषी विज्ञान केंद्रांना कळविणे, तज्ज्ञांना भेटी देण्यास बोलविणे. शेवग्याच्या संदर्भातील सर्व विषय अनुभवाच्या रूपाने या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. तरी हे पुस्तक शेतकरी बांधवांना, विकास अधिकाऱ्यांना, तज्ज्ञ, विविध क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना व आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणाऱ्यांना निश्चितच मार्गदर्शक व प्रेरणा देणारे ठरेल अशी अशा आहे.