आदिवासी क्षेत्रात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा 'सिद्धीविनायक' मोरिंगा व 'आस्वाद आळू' चा कुपोषणात सुद्दढ आरोग्यासाठी फायदा

वैशाली गवंडी,
रूरल कम्युन्स, अनुभविक प्रशिक्षण केंद्र, नारंगी, ता. खालापूर, जि. रायगड.
फोन नं. (०२०) २४२७०२१६, मो.: ९४२३८९१४०१


आम्ही रूरल कम्युन्स संस्थेमार्फत आदिवासी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न व नवीन - नवीन प्रयोग करतो. त्यातून आदिवासी लोकांना रोजगार व उदरनिर्वाहासाठी भाजीपाला उपलबध व्हावा म्हणून आम्ही संस्थेमार्फत प्रायोगिक तत्वावरती २०१० पासून 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याच्या २५० झाडांची लागवड ठाणे कार्यक्षेत्रात केलेली आहे. त्याची वाढ उत्तम असून शेंगांची गुणवत्ता चांगली आहे. ह्या शेवग्याचा प्रयोग फारच यशस्वी झाला असून गावकरी त्याचा वापर स्वतःच्या कुटुंबासाठी करत आहेत.

आम्ही शेवग्याबरोबरच 'आस्वाद' आळू कंद पुण्याहून नेऊन सिमेंटच्या रिकाम्या गोण्यात माती भरून गोण्यांना चारही बाजुने २ - २ होल ६ - ६ इंच अंतरावर खाली - वर पाडून त्यामध्ये आळूचे कंद तिरपे सुर्यप्रकाशाच्या दिशेने लावले तर त्यातील आळू चांगल्याप्रकारे फुटून प्रत्येक कंदापासून २ - ३ पाने मिळतात. त्याची ते लोक भाजी करतात. तिला आळूचे फदफदे असे म्हणतात. मोरिंगा शेवग्याचा पाला, शेंग, फुले यांची आम्ही 'न्यूट्रिशनल व्हॅल्यू' काढली आहे. सध्या आम्ही खेड तालुक्यातील (जि. पुणे) कुपोशीत मुलांसाठी काम करत आहोत. त्यासाठी सप्टेंबर २०१३ पासून मोरिंगा शेवग्याची लागवड खेड येथील प्रकल्प कार्य क्षेत्रामध्ये करत असून त्यासाठी सरांकडे माहिती घेण्यास आले आहे. यावेळी सरांनी सखोल मार्गदर्शन करून 'कृषी विज्ञान' अंक भेट दिले. आम्हास भारत सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याकडून आर्थिक सहाय्य (अनुदान) मिळते. आमच्या रिपोर्टमध्ये आम्ही डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा आदिवासी क्षेत्रात फार मोलाचा फायदा झाला, याचा उल्लेख केलाय. तो पाहून S & T चे शाश्त्रज्ञ व स्टाफ यांचाही आम्हाला प्रतिसाद चांगला मिळत आहे.