डाळींबास कळी निघू लागली म्हणून हळदीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

श्री. सदाशिव विठोबा श्रीराम,
मु. पो. काळी (दौ.), ता. महागाव (पुसद), जि. यवतमाळ.
मोबा. ९८५०९०८६८७



३ वर्षापुर्वी तांबड्या मुरमाड प्रतिच्या जमिनीत १२ x १२ फुटावर भगवा, गणेश आणि आरक्ता या तिन्ही वाणांची लागवड एकूण ४.५ एकर क्षेत्रात केली आहे. गेल्यावर्षी पहिला बहार धरला होता. सुरुवात असल्याने जादा माल धरला नव्हता. पाहुण्यांना, शेजारी - पाजारी मित्रमंडळींना फळे देऊन ३ - ४ टन माल विक्रीस गेला.

चालू वर्षी जूनमध्ये छाटणी करून बहार धरला. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा ऑगस्टमध्ये प्रथमच वापर सुरू केला. कळी निघण्यासाठी सप्तामृत वापरले. कळी निघत आहे. झाडांनाही टवटवीतपणा आहे. कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव नव्हता. नंतर पाऊस जादा झाल्याने कळीवर बुरशीचा प्रादुर्भाव जाणवू लागला म्हणून दुसरी फवारणी सप्टेंबरमध्ये घेतली. तर बुरशी आटोक्यात येऊन कळी सेटींग सुरू झाले. आता तिसऱ्या फवारणीसाठी माहिती व औषधे घेण्यास आलो आहे.

हळद जूनमध्ये २ एकर लावली आहे. सेलम वाण आहे. बेणे गावातील शेतकऱ्याकडून घेतले होते. २ एकरासाठी १८ क्विंटल बेणे घेतले होते. लागवडीनंतर सतत पाऊस असल्याने ३ महिन्याची हळद होऊनसुद्धा समाधानकारक वाढ नाही. करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तेव्हा करपा जाऊन कंद वाढीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी घेण्यास आलो आहे.