भगव्यात राईपनर, न्युट्राटोनने १ आठवड्यात फरक

श्री. प्रसाद शामराव कुलकर्णी,
मु. पो. घेरडी, ता. सांगोला, जि. सोलापूर -४१३३०९.
मो. ९९७०६१३९९७


गेल्यावर्षी सप्टेंबर २०१२ मध्ये मी भगवा डाळींबाचा हस्त बहार धरला. त्यावेळी पाऊसही कमी होता. कशीतरी बाग जोपासली. झाडावर फळांची संख्या ५० -५५ अशी जेम - तेम होती. झाडांची संख्या ९०० होती. झाडात/काडीत ताकद होती. फळे चांगली होती पण फुगवण होत नव्हती व आकर्षक नव्हती. मी सहज पुणे येथील गुलटेकडी मार्केटमध्ये फिरत असताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती वाचली व तेथील मॅनेजरशी संपर्क साधला व त्यांनी मला न्युट्राटोन व राईपनर ही औषधे दिली. घरी गेल्यावर मी ती फवारली तर आठवाड्यात फळामध्ये आकार व वजन वाढल्याचा फरक जाणवला. १-२ आठवड्यानंतर तोडे केली तर पैसे ही मनासारखे झाले. आता मी मागचा अनुभव लक्षात घेऊन सध्या 'मर' रोगाचे प्रमाण जास्त आहे, तेव्हा मर रोगाच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन घेतले. त्यानुसार डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरून मर रोग निश्चितच आटोक्यात येईल अशी खात्री वाटते.