वनस्पतींच्या जाती व शेतकऱ्यांचे हक्क संरक्षण विद्येयक - १९९९:करिता सुचना

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


शेतकऱ्यांना वैशिष्ट्यपूर्ण विविध पिकांच्या जाती/बियाण्यांचा वारसा वाडवडिलांकडून पिढ्यानू पिढ्या मिळाला आहे. अशा जातींच्या लागवडीमध्ये प्रामुख्या ने अधिक उत्पादन व दर्जा यास प्राधान्य दिले गेले आहे. अशा जाती/बियाण्यांचे आंतरराष्ट्रीय कंपन्या इतर बीज उत्पादक व अनिवासी भारतीयांसहित परदेशातील संशोधन व्यक्तींपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. अशी उत्तम दर्जा असणारी विविध फुलपिके, फळपिके, धान्यापिके, तंतुमय पिके, वनशेती व नर्सरीतील पिके हि विविध रोगांना प्रतिकारक असून या पिकांस खाते व पाणी मर्यादित स्वरूपाची लागतात. अशा पिकांच्या जातींची निवड करून, सुधारणा करून किंवा मूळ जातींपासूनच्या सुधारीत जाती उदा. मालदांडी - ३५ ही ज्वारीची जात गेल्या ६० वर्षापासून आजतागायत उत्पादन व दर्जा यात श्रेष्ठ आहे. परंतु सोनोरासारख्या आयात केलेल्या हायब्रीड उत्पादित जाती (H.Y.V.) चे उत्पन्नात घट होत आहे. कल्याण सोना ही गव्हाची जात ही उत्पन्न कमी देत आहे. आपणांस वांगी, कारली, आले, हळद, कडू नीम, बासमती तांदूळ पिकांचे पेटंट अनिवाशी भारतीय, अमेरिकन लोकांनी घेतल्याचे वाईट अनुभव आहेत. तेव्हां वेळीच वरील प्रकारचे बियाण्यांचे/जातींचे संकरीकरण किंवा विविध गुणधर्माची पडताळणी करिता केल्यास व विविध क्षेत्रात लागवड यशस्वी करून Multiplication केल्यास अशा बियाण्यांवर स्थानिक शेतकऱ्यांचा प्रथम कायदेशीर हक्क प्राप्त असावा. अशा वितरणावरील फायदा त्यांना कायमचे मानधन स्वरूपात किंवा नफ्यातील वाटा या स्वरूपात देण्यात यावा. असे हक्क स्थानिक आयुर्वेदिक वनस्पतींच्या औषधांबाबतीतही आसवे. अशा सर्व वैशिष्ट्यपूर्ण पिकांचे संरक्षण, जतन, संवर्धन जोपासना झाली पाहिजे. विविध पिकांचे जातीचे व शेतकऱ्यांचे हक्क संरक्षित करण्यसाठी, एका चौकटीत बसविण्यासाठी योग्य संकलन Multiplication युद्ध पातळीवर झाले पाहिजे. तेव्हांच पिढ्यांनं - पिढ्या चालत आलेल्या या वारसाहक्काचे संरक्षण आंतरराष्ट्रीय पेटंट चॅलेंजपासून होऊ शकेल.

विविध पिकांच्या जातींचे संकलन करताना (In Documentation) : स्थानिक नांव (Local Name), मुळ ठिकाण (Place of origin), मुलभूत नाव (indigenous Noumenclature), शास्त्रीय नाव, (Scientific Nomenclature), किती वर्षापासून ही जात वापरत आहे व काही सुधारणा अंमलात आणल्या असल्याने त्याबद्दलची सविस्तर माहिती, ठिकाण व क्षेत्र, एकूण लागवडीचे क्षेत्र वितरण, फायदे व तोटे, विविध गुणधर्म वैशिष्ट्ये लागवड करताना घ्यावयाची काळजी या सर्व बाबी समाविष्ट करणे आवश्यक आहे. अशा जाती ओळखण्यासाठी खास गुणधर्म/वैशिष्ट्ये, वैयक्त्तिक, विशिष्ट समाज, सरकार, विना सरकारी संस्था (NGO's), व्यक्तींचे काही हक्क, त्याचप्रमाणे परदेशी कंपन्यांनी संकरीकरणासाठी अशा जाती घेतल्या असल्याय त्याची माहितीही विशेष नमूद करावी व यापुढे या कामासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांचा भारतात शिरकाव होऊ देऊ नये.

थोडक्यात : विविध पिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण, मौल्यवान जाती ओळखण्यासाठीचे विशेष गुणधर्म, वैशिष्ट्य नमूद करावे. अनिवाशी भारतीयांसहित कोणत्याही परदेशी कंपन्यांना अशा जातींचा वापर करण्यास परवानगी देऊ नये. मा. साहेबसिंग वर्मा, माजी केंद्रीय मंत्री व दिल्ली राज्याचे माजी मुख्य मंत्री यांचे अध्यक्षतेखाली वनस्पतींच्या जाती व शेतकऱ्यांचे हक्क संरक्षण विधेयक १९९९ करीत सुचना बोलवण्यासाठी मुंबईस एक कृषी क्षेत्रातील अनुभवी लोकांची बैठक बोलावली होती. त्यावेळेस मा. डॉ.वि.सु.बावसकर सरही हजर होते. त्यावेळेस केलेल्या सुचना लोकसभेचे डायरेक्टर, नवी दिल्ली येथे आम्ही पाठविल्या. त्या सुचनांचा पुर्ण विचार झाला व शेतकऱ्यांचे हक्क संरक्षण अबाधीत ठेवण्यात आम्हाला यश आले.