शेजारील उसापेक्षा १० महिन्यातच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दीडपट वाढ

श्री. इंदरराव तुळशीराम लाटे,
मु.पो. देवला, ता. सेलू, जि. परभणी


मी पुर्वी पारंपारिक पद्धतीने शेती करीत होतो. पण गेल्यावर्षी किसान कृषी प्रदर्शन (पुणे) मध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा स्टॉल पाहिल्यावर तेथून तंत्रज्ञानाबद्दल माहिती तसेच ऊस व कृषी विज्ञानची काही पुस्तके घेतली. घरी गेल्यावर ती पुस्तके वाचल्यानंतर डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने शेती करण्याचा निर्णय घेतला. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने शेती करण्याचा निर्णय घेतला. डॉ.बावसकर तंत्रज्ञाना प्रथम ऊस पिकावर वापरायचे ठरविले. त्याकरिता लागवडीसाठी १ लि. जर्मिनेटर तिरूमल अॅग्रो डेव्हलपर्स, परभणी येथून आणले. १०० लि. पाण्यामध्ये १ लि. जर्मिनेटर घेऊन त्या द्रावणात उसाचे बेणे १५ मिनिटे बुडवून ३१ डिसेंबर २०१४ ला लागवड केली. यामध्ये ३१०२ वाणाची १ एकर आणि ८४०१२ वाणाची २० गुंठे अशी एकूण १।। एकरमध्ये ५ x ५ फुटावर ही लागवड केली आहे.

जर्मिनेटरच्या प्रक्रियेमुळे पहिल्यांदाच ११ - १२ व्या दिवशी सर्वत्र एकसारखे फुटवे दिसून आले. त्यानंतर मग १ महिन्याने ड्रीपद्वारे एकरी १ लि. जर्मिनेटर दिले आणि थ्राईवर ४० मिली, क्रॉपशाईनर ४० मिली, प्रिझम ४० मिली आणि राईपनर ३० मिली/पंप (१५ लि. पाणी) याप्रमाणे फवारणी केली. त्यामुळे उसाची जोमाने वाढ होऊ लागली.

या उसाला रासायनिक खतांचा अल्प प्रमाणात वापर केला. ज्यावेळेस ३ महिन्यांचा ऊस होता तेव्हा दुसरी फवारणी थ्राईवर १ लि. राईपनर १ लि. आणि प्रोटेक्टंट १ किलो + २०० लि. पाणी याप्रमाणे केली. पुन्हा १ महिन्यांनी थ्राईवर, राईपनर, प्रोटेक्टंट सोबत १ लि. न्युट्राटोन घेऊन तिसरी फवारणी केली. त्यानंतर ४।। महिन्याचा ऊस असताना २ लि. जर्मिनेटर १।। एकरसाठी ३०० लि. पाण्यातून ड्रीपद्वारे दिले. त्यानंतर मात्र उसाला काही फवारणी केली नाही. तरी वरीलप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्याने सध्या १० महिन्याच्या उसावर आतापर्यंत कोणत्याही रोग - किडीचा प्रादुर्भाव नाही. सध्या २८ ते ३० कांड्यांवर ऊस आहे. उसाच्या जाडीत व पेऱ्यातही नेहमीपेक्षा जास्त वाढ जाणवत आहे. उसाची पाने हिरवी व रुंद आहेत.

आमच्या शेजाऱ्याच्या शेतातील उसापेक्षा दीडपट वाढ अधिक आहे. शिवाय तिही कमी खर्चात, त्यामुळे डॉ.बावसकर तंत्रज्ञानावर आम्ही समाधानी आहोत. एकरी ७० ते ८० टन उत्पादन निश्चितच मिळेल अशी खात्री आहे. आमच्या भागात सरासरी ४० ते ५० टनापर्यंतच उत्पादन मिळते.