३० गुंठे टोमॅटो १३०० क्रेट, सरासरी १७५ रू./क्रेट भाव, १।। लाख नफा

श्री. प्रकाश राजाराम क्षिरसागर,
मु.पो. सोनवडी, ता. फलटण, जि. सातारा.
मो. ९०९६२७४५६१


आम्ही गेली १२ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा टोमॅटो, द्राक्ष, डाळींब या पिकांसाठी वापर करतो. माझे या १२ वर्षात असे एकही पीक नाही की, ज्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरली नाहीत. माझ्या अनुभवानुसार डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी म्हणजे खरच शेतकऱ्यांसाठी एक विमा संरक्षण म्हणून काम करते.

चालू वर्षी मी टोमॅटो पिकाची ८००० रोपे १५ जून २०१५ रोजी लावली. जमीन भारी काळी आहे. ६ फूट रुंदीच्या सरीवर १। (सव्वा) फुटावर रोप लावले. लावल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी जर्मिनेटरचे ड्रेंचिंग केले. त्यामुळे रोपांची मर झाली नाही. पांढऱ्या मुळीचा जारवा लवकर वाढू लागल्याने शेंडा फुट लवकर चालू झाली. नंतर १५ दिवसांचा प्लॉट असताना जर्मिनेटर, प्रिझम, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी २५० मिलीची १०० लि. पाण्यातून फवारणी केली. त्यामुळे टोमॅटो पिकाची निरोगी, जोमाने वाढ होऊन पानांन काळोखी आली. पुढे हवामान खराब असल्याने या पिकावर कॉलररॉटचा प्रादुर्भाव झाला. याचे प्रमाण जास्त वाढण्यापुर्वीच लगेच जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंट व हार्मोनी या औषधांचे ड्रेंचिंग केले. याचा रिझल्ट चांगला मिळाला. कॉलर रॉटचा प्रादुभार्व आठवड्याच्या आत आटोक्यात येऊन प्लॉट पुर्ववत झाला. त्यानंतर नियमित १५ ते २० दिवसाला सप्तामृताच्या फवारण्या घेत होतो. त्यामुळे पुढे कोणत्याही रोगाला पीक बळी पडले नाही.

हे टोमॅटो २० ऑगस्ट २०१५ ला चालू झाले. सुरुवातीला आठवड्यातून २ वेळा, नंतर पुढे ३ वेळा असा तोडा करू लागलो. सुरुवातीला टोमॅटोला भाव फारच कमी होते तरी आपला माल उत्कृष्ट क्वॉलिटीचा असल्याने १५० रू./क्रेट भाव मिळत होता. पुढेही बाजारभावात फार काही वाढ झाली नाही. १५० पासून १६०, १७० असा २०० रू./क्रेट पर्यंत भाव मिळाला. हा सर्व टोमॅटो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात संपला. शेवटी - शेवटी काही मालाला २२५ रू./क्रेट असा भाव मिळाला. या ३० गुंठे क्षेत्रातून एकूण १३०० क्रेट टोमॅटो उत्पादन मिळाले. सरासरी बाजारभाव १७५ रू./क्रेट प्रमाणे सव्वा दोन लाख रू. झाले. या टोमॅटोसाठी एकूण ७० ते ७५ हजार रू. खर्च झाला असून यातील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी १५ हजार रू. पर्यंत खर्च झाला आहे. बाजारभाव कमी असतानाही केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने हे शक्य झाले. म्हणून जे जे लोक आमचे प्लॉट पाहण्यास येतात त्यांना अभिमानाने सांगते की, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा हा परिणाम आहे व तुम्हीही हे तंत्रज्ञान एकदा अवश्य वापरा.

२५० झाडांपासून २०० क्रेट सुपर भगवा दर २००० रू./क्रेट (२० किलो)

माझ्याकडे सुपर भगवा जातीचे डाळींब आहे. गेल्यावर्षी त्याचा पहिला बहार धरला होता. टिश्युकल्चर रोपे जळगाववरून आणली होती. लागवड १२' x ८' वर आहे. २० गुंठ्यात २५० झाडे आहेत. या बागेला लागवडीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कल्पतरू सेंद्रिय खत, जर्मिनेटरचे ड्रेंचिंग व सप्तामृतच्या फवारण्या नियमित घेत असतो. त्यामुळे १।। वर्षातच (गेल्यावर्षी) पहिला बहार धरला, सुरूवातीपासून सेंद्रिय खताचा व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत औषधांच्या वापरामुळे बाग एकदम सशक्त, निरोगी राहून काडी पक्व झाल्यामुळे प्रत्येक झाडावरून ३५ ते ४० फळे चांगल्याप्रकारे मिळाली.

२५० झाडांपासून २०० क्रेट डाळींबाचे उत्पादन मिळाले. डाळींब फळे एकसारखी, मोठी, लालभडक रंगाची आकर्षक चमक असलेली, डागविरहीत असल्याने फलटण मार्केटला २००० रू./क्रेट (२० किलो) प्रमाणे भाव मिळाला. शेवटची मध्यम व काही लहान फळे होती ती देखील फळे आकर्षक चमक व कलरमुळे १४०० रू./क्रेट भावाने विकली गेली. त्यामुळे अर्ध्या एकरातून ३ लाखाच्यावर उत्पन्न मिळाले. यासाठी दर महिन्याला जर्मिनेटरचे ड्रेंचिंग व हवामानातील बदलानुसार १० ते १५ दिवसाला सप्तामृत औषधे फवारत होतो. यामुळे आम्ही ५ - ५ लि. चे कॅन घेऊन जातो.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मादी कळी वाढली

आता चालूवर्षी याच बागेचा दुसरा बहार घेण्यासाठी मे - जून मध्ये कल्पतरू हे सेंद्रिय खत शेणखत आणि कोंबड खतात मिक्स करून दिले. पहिले पाणी दिल्यानंतर लगेच जर्मिनेटचे ड्रेंचिंग केले आणि जर्मिनेटर, प्रिझमची फुटीसाठी फवारणी केली. त्यामुळे फुट चांगल्याप्रकारे होऊन पाने रुंद, हिरवीगार झाली. फुलकळी निघाल्यावर थ्राईवर १ लि., क्रॉपशाईनर १ लि., प्रोटेक्टंट १ किलोची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. त्याने गळ फारच कमी झाली. लगेच आठवड्याने पुन्हा थ्राईवर १ लि., क्रॉपशाईनर १ लि., प्रोटेक्टंट १ किलो आणि न्युट्राटोन १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केल्यामुळे मादी कळीचे प्रमाण वाढले.

त्यानंतर गाठ सेंटिंग अवस्थेमध्ये फळे लिंबू आकाराची असताना थ्राईवर १ लि., क्रॉपशाईनर १।। लि., न्युट्राटोन १ लि., हार्मोनी ५०० मिलीची २०० लि. पाण्यातून चौथी फवारणी केली. तर सध्या प्रत्येक झाडावर चिकूच्या आकाराची ४० ते ६० फळे आहेत. आता यापुढीलही फवारण्या घेऊन पहिल्या बहाराप्रमाणे उत्तम क्वॉलिटीचे डाळींब उत्पादन घेणारा आहे.

१ एकर सुपर सोनाका १२०० वेली ३।। टन, दर जागेवर ३३ रू./किलो

याच बरोबर ३ वर्षाची सुपर सोनाका द्राक्षबाग १ एकर आहे. ८' x ५' वर एकूण १२०० द्राक्षवेली आहेत. याचा पहिला बहार गेल्यावर्षी धरला होता तर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ३।। टन उत्पादन पहिल्याच वर्षी मिळाले. फलटणच्या व्यापाऱ्यांनी ३३ रू./किलो प्रमाणे सर्व माल घेतला.

यावर्षी (दुसऱ्या बहाराची) ऑक्टोबरमध्ये फळ छाटणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेस्टमध्ये जर्मिनेटरचा वापर केला तर ५ व्या दिवशी सर्व डोळे फुटून आल्याचे दिसले. आता पुढील फवारण्या वेळापत्रकाप्रमाणे घेत आहे.