हार्मोनी वापरामुळे डावण्या, पावडरीवर प्रतिबंधात्मक उपाय, खर्चात बचत

श्री. जगन्नाथ शंकर माळी,
मु.पो. सावळज, ता. तासगाव, जि. सांगली,
मोबा. ९७६६६७९५३४



क्षेत्र - ३ एकर, जात- माणिकचमन, सोनाका
छाटणी तारीख - २५ सप्टेंबर २०१०

माझ्या बागेत हार्मोनी १५० मिली + झेड ७८,१०० ग्रॅम + क्लोरो ३०० मिली + १०० लि. पाणी असे एकसारखे १० ते १५ दिवसातून स्प्रे घेत रहिलो, त्यामुळे माझ्या बागेत डावणी कसलाच दिसला नाही. काही ठिकाणी खराब वातावरणामुळे पानावरती डावणीचे स्पॉट मोजक्या प्रमाणात दिसले, परंतु जास्त फुलले नाही.

त्याचबरोबर मण्यावर व पानावरती काळोखी दिसून येते. हार्मोनी वापरामुळे माझ्या बागेत डावणी व भुरी वरील रासायनिक औषधांच्या वापरात बरीच बचत झाली. या सर्व फायद्यामुळे मला वाटते की, हार्मोनी हे औषध शेतकऱ्यांसाठी फार फायद्याचे आहे.