अति पावसात सर्वांची पत्ती झडली पण माझी सुरक्षित, २ खुड्यात ३०० क्रेट, ५४ हजार

श्री. रामदास गोविंदराव गोरडे,
मु. पो. खेडले झुंगे, ता. निफाड, जि . नाशिक.
मोबा. ९८२३४४३७९१


नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खेडले झुंजे हे माझे गाव. माझे वय ३१ वर्षे. मी बऱ्याच वर्षापासून डाळींब, टोमॅटोची शेती करतो. पण टोमॅटो शेतीचा चालू वर्षाचा अनुभव चेहऱ्यावर हसू व मनाला सुखावणारा आहे आणि हे शक्य झाले केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे.

टोमॅटो पीक बरेच शेतकरी घेतात. पण इतरांपेक्षा अधिक दर्जेदार उत्पादन घेण्याचे मी ठरविले. त्यासाठी मी जे. के. अक्षय वाणाची निवड केली. ४ फूट सरीवर १॥ एकर मध्यम काळ्या जमिनीमध्ये लागवड केली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीविषयी ऐकून होतो, पण तंत्रज्ञान वापरले नव्हते. यावेळी कंपनी प्रतिनिधी श्री. शिंदे यांचा फोन नंबर मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी लागवड झाल्यानंतर प्रत्यक्ष प्लॉटवर येऊन पाहणी करून जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, हार्मोनी यांची फवारणी करण्यास सांगितले. त्यांच्या सल्ल्यानुसार जर्मिनेटर ५० मिली, थ्राईवर ५० मिली, क्रॉंपशाईनर ५० मिली , हार्मोनी १५ मिली प्रति १० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. परिणामी ३ ते ४ दिवसांनी मी प्लॉटमध्ये गेलो असता. माझ्या प्लॉटबरोबर लागवड केलेल्या इतर शेतकऱ्यांच्या प्लॉटपेक्षा माझ्या प्लॉटमध्ये विलक्षण बदल जाणवला. प्लॉटची वाढ, फूट जोमाने होऊन पत्तीस काळोखी आली. हार्मोनी वापरल्यामुले भुरी, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. त्यानंतर प्रतिनिधी शिंदे यांना फोन करून बोलावून घेतले व पुढील माहिती घेतली. त्यानुसार आतापर्यंत मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या १० ते १२ दिवसाच्या अंतराने ५ फवारण्या वेळापत्रकानुसार केल्या आहेत. परिणामी प्लॉट पुर्णपणे निरोगी असून सर्वच बाबतीत इतरांपेक्षा सरस आहे. विशेष म्हणजे २ दिवस अति पाऊस होऊनही पत्ती चांगली आहे. इतरांची पत्ती गेली. माझ्या प्लॉटला माल भरपूर लागला आहे. सुरुवातीच्या २ - ३ खुड्यातच ३०० क्रेट माल निघाला. त्याला २५० ते ३०० रू. भाव मिळाला. तोडे चालूच आहेत. आतापर्यंत काढलेल्या मालापासून ५४ हजार रुपये झाले आहेत. इतर शेतकरी माझ्या प्लॉटवर येऊन विचारतात इतका सरस प्लॉट कसा ? मी त्यांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरत असल्याचे सांगतो. खरच मी सरांच्या तंत्रज्ञानामुळे खूप सुखावला असून चालू वर्षी डाळींब पिकासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा सुरूवातीपासून वापर करणार आहे.