गाईच्या दुधास लोक म्हशीचे दूध म्हणून वापरू लागले !

श्री. गोपीचंद महादेव जाधव,
मु. पो. फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे


मी थेऊर सहकारी खाखर कारखान्यात मोठ्या वजन काट्यावर काम करत आहे. गेल्या २५ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने वडीलोपार्जित २ एकर शेतीमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन घेतो. दररोज रात्रपाळीला रात्री ९.०० ते पहाटे ४.०० पर्यंत ड्युटी करून ४.०० ते ८.०० विश्रांती घेवून सकाळी ८.०० ते १२.०० पर्यंत शेतातील काम करतो. यामध्ये मला माझी पत्नी व सकाळी शाळा भरेपर्यंत मुलगा व मुलगी मदत करते. मुलांना 'रावे' प्रकल्पासारखा घरच्याच शेतावर आपोआपच अनुभव मिळाल्याने पुढे त्यांच्या जीवनात त्याचा निश्चितच त्यांना फायदा होईल.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने २ एकर शेतीत वांगी, टोमॅटो, भोपळा, कारली, दोडका, मेथी, कोथिंबीर, पालक, आषाढ महिन्यात विक्रीस येईल याप्रमाणे कांदा पात घेतो. कांदा पात ४ रू. पासून ३५ रू./गड्डी पर्यंत हडपसर मार्केटला विकली आहे. १२.०० वाजेपर्यंत शेतातील ताजा माल काढून हडपसर मार्केटला १.०० वाजता एम - ८० गाडीवर बांधून नेत असे. तर आमच्या मालाची चमक पाहून १ नंबर भाव मिळतात. हडपसरला शेतकरी - ग्राहक असे थेट मार्केट आहे. ग्राहक आमच्या मालाची वाट पाहतात. तुमची कोथिंबीर मार्केटचे नाक आहे असे म्हणतात.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने भाजीपाल्याप्रमाणे चारापिकांवरही या तंत्रज्ञानाने क्रांती केल्याचे अनुभवले आहे. कारण आमच्याकडे जर्सी गाय आहे. तिच्यासाठी लावलेल्या चाऱ्या वर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे स्प्रे घेतले होते. हा चारा गाईला देत असे आणि गाईचे दूध रतिबाला घालत असे. तेव्हा गाय गाभण असल्याने मी त्यांना सांगितले पुढील आठवड्यापासून 'गाईचे' दूध देऊ शकता नाही. तर ते म्हणत तुमच्या 'म्हशीचे' दूध खूप चांगले आहे. मी त्यांना गाईच्या दुधाबद्दल बोलत असे व ते म्हशीच्या दुधाचा उच्चार करत. असे २ - ३ वेळा झाले. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने निर्माण केलेला चारा जर्सी गाईला घातला तर गाईच्या दुधाची फॅट व सकसपणा वाढून ते लोकांना म्हशीचे दूध वाटत. केवढी क्रांती या तंत्रज्ञानात आहे!f