एरवी महिन्याने कापणीस येणारा १॥ ते २ फूट मेथी,घास घास २१ दिवसात २॥ - ३ फूट उंच मिळू लागला

श्री. जगन्नाथ सुदाम पाडेकर,
मु. पो. संतवाडी आळे, ता. जुन्नर, जि. पुणे.
मोबा. ९७६६४५७०१६/८६२४८१६५२८


१० -१२ वर्षापासून भाजीपाला पिकांचे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन घेत असतानाच चारा पिकांवरही डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचे स्प्रे घेऊ लागलो. तर आश्चर्यकारक परिणाम जाणवले. दीड फुट वाढणारा मेथी घास २॥ - ३ फुटापर्यंत वाढू लागला. शिवाय एरवी ३० दिवसांनी कापणीस येणारा हा घास २१ -२२ व्या दिवशी कापणीस येऊ लागला.

हत्ती गवताचे बाबतीतही तसेच झाले. उन्हाळ्यात पाण्याचे ताणाने सुकलेले हत्ती गवतास 'सप्तामृत' फवारणी ने शेंडा हिरवा निघून तो चांगला वाढू लागला. अधिक फुटवे निघू लागले. पाने खोडापासून शेंड्यापर्यंत हिरवीगार रसरशीत मिळू लागली. उंची ७ - ८ फुटापर्यंत होऊ लागली. हा घास रसरशीत असल्याने घास अजिबात वाया जाता नाही.

१० -११ लिटर दूध देणाऱ्या गाई १५ - २० लिटर दूध देऊ लागल्या

नेहमी जमिनीपासून १ ते १।। फुटाचा भाग जाड, कमी रसाचा झाल्याने जनावरे खात नसत. कुटीमशीनद्वारे चारा बारीक करून वाया जाणारा चाराही वापरात येऊ लागला. आणि सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे १० ते ११ लि. दूध देणाऱ्या गाई १५ ते २० लि. दूध देऊ लागल्या. ५ गाईंपासून पुर्वी ५० ते ५५ लि. मिळत होते. तेथे ८५ ते ९० लि. दूध मिळू लागले. शिवाय फॅटसुद्धा वाढली. (संदर्भ - कृषी विज्ञान, ऑगस्ट २०१३, पान नं. ९)