मोराची चिंचोली कृषी पर्यटनातून कमी वजनाच्या परंतु दर्जेदार डाळींबाला जागेवरून पर्यट कांकडून चांगला भाव व मालाचा अधिक उठावही !

श्री. मारुती गोविंद उकीरडे,
मु.पो. चिंचोली, ता.शिरूर, जि.पुणे.
मोबा. ७८७५९९२२७९



आम्ही टिश्युकल्चर भगवा डाळींबाची ५५० रोपे १।। एकरमध्ये १२' x ८' वर जानेवारी २०१३ मध्ये लावलेली आहेत. टिश्यूकल्चरची रोपे असल्याने आणि त्याला सुरूवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्याने झाडांची वाढ अत्यंत कमी कालावधीत झपाट्याने झाली. १० महिन्यात झाडे ५ फूट उंचीची होऊन झाडाचा घेर ३ ते ४ फूट होता. त्यावेळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी नारायणगाव शाखेच्या प्रतिनिधींना प्लॉट पाहण्यास बोलविले. त्यांनी प्लॉटची पाहणी करून मालकाडी तपासून बहार धरण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर नोव्हेंबर २०१३ मध्ये बागेस ताण दिला. मात्र थंडीत ताण व्यवस्थित न बसल्याने कळी कमी लागली. तसेच थंडीत मधमाशा देखील फिरकत नसल्याने आणि कळी वाढण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या १० -१५ दिवसाच्या अंतराने २ फवारण्या केल्या. तेवढ्यावर मधमाशा वाढून फळांचे सेटिंग झाले. झाडांवर ३५ ते ४० फळे लागली. हा माल लागलेला असतानाच नवीन कळी लागत होती. त्यामुळे २ टप्प्यात माल लागला. फळांच्या फुगवणीसाठी आणि फळांना चमक येण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुन्हा १५ दिवसांच्या अंतराने ३ फवारण्या केल्या. त्यामुळे सुरुवातीस लागलेल्या मालाची फुगवण अधिक झाली, झाडावर ६०- ७० फळे होती. त्यातील सुरुवातीला लागलेली ३० - ३५ फळे मोठी होती.

एका झाडापासून कधी - कधी २० -२२ किलोचे क्रेटभर माल निघत होता. फळे वजनदार जड वाटायची, रंग आकर्षक लाल होता. रूबी मानकासारखे दाणे चमकत होते. डाळींब फोडले असता दाणे टचकण उडायचे आणि दाणा फुटला की लालभडक कलर उडायचा. सुरूवातीस लागलेल्या मालाची फुगवण अधिक झाल्याने ५०० ते ५५० ग्रॅम वजनाची फळे भरत असत. नंतर फुलकळी लागलेला माल साधारणच राहिला.

जागेवरून मुंबईच्या व्यापाऱ्यांनी ७० रू./किलो भावाने १८० क्रेट माल नेला. ६० क्रेट पुणे मार्केटला के.डी.चौधरी यांच्या गाळ्यावरून ४३,३२,२५ रू. भावाने विकला गेला. बारीक माल किरकोळ मार्केटला चाकणला विकला.

चिंचोली येथे मोर भरपूर असल्याने मोराची चिंचोली म्हणून या गावची ओळख आहे आणि मोरांमुळे येथे पर्यटन केंद्र आहेत. येथे देश - परदेशातील पर्यटक येतात. पर्यटकांच्या सोयीसाठी आम्ही ४ रूम बांधल्या आहेत. मुक्कामी असणाऱ्या पर्यटकांकडून ५०० रू. भाडे घेतो आणि दिवसाच्या पर्यटकासाठी (संध्याकाळी परत जाणाऱ्या) ३०० रू. घेतो. त्यामध्ये एकवेळचे जेवण देतो. त्याचबरोबर पर्यटकांना शेतातून (बागेतून) ट्रॅक्टर फिरवणे, झोके फ्री असतात. जेवणामध्ये प्लेटला ३ - ४ प्रकारच्या चटण्या, खर्ड्डा, लोणचे, चुलीवरच्या भाज्या हे सर्व घरचीच माणसे स्वयंपाक करतात. त्यामुळे याला घरगुती चांगली चव असते. शनिवार, रविवार २५ - ३० पर्यटक येतात. यातील १० -१५ मुक्कामी राहतात. इतर दिवशी कमी असतात. आमच्या येथे आंबा, पेरू, संत्रा, डाळींबाच्या बागा आहेत. पाणी पिण्यासाठी मोर येतात. डोंगर उतारावर १२ एकरचा हा फार्म आहे.

डाळींब बागेत मोर येतात, मात्र फळांना टोच्या मारत नाहीत. मक्याचे पीक असेल तर ते भरपूर खातात. डाळींबाची मोठी फळे विकून १५० ते २०० ग्रॅमची फळे पर्यटक ५० रू./किलो प्रमाणे घेतात. डाळींब गोड, आकर्षक, दाणे लालबुंध रसाचे असल्याने एक - एक पर्यटक ५ -५, १० - १० किलो डाळींब नेतात.

या ५५० झाडांच्या १० व्या महिन्यातील बहारापासून ४ लाख रू. चे उत्पन्न मिळाले आहे. आता दुसऱ्या बहाराचे नियोजन आहे. तेव्हा सरांचे मार्गदर्शन घेण्यास आज ५ सप्टेंबर २०१४ रोजी पुणे ऑफिसला आलो आहे.

भाव ६८ रू./१० किलो असूनही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे २ एकर कांद्याचे २ लाख ३८ हजार

डाळींबाबरोबरच गेल्यावर्षी ऑक्टोबर २०१३ मध्ये लावलेल्या २ एकर गरव्या कांद्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले. जमीन पठारावरील तांबट काळ्या प्रतिची आहे. याला कल्पतरू सेंद्रिय खताच्या १२ बॅगा आणि डी.ए.पी. ३ गोण्या दिल्या होत्या. थंडीत कांद्यावर थ्रिप्सचा प्रादुर्भाव होऊन पाती वाकड्या होत होत्या. तेव्हा लगेच सप्तामृत औषधांची फवारणी केली. तर पाती लगेच सरळ होऊन काळोखी आली. नंतर कांदा पोसण्यासाठी २।। महिन्याचे पीक असताना थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, आणि न्युट्राटोनची फवारणी केली. तर ३।। महिन्यात कांदा काढणीस आला.

कांदा गोल्टी, डबलपत्तीचा, वजनदार मिळाला. २ एकरातून ५० किलोंच्या एकूण ७०० बॅगा कांदा निघाला. त्यावेळी बाजारभाव मात्र अत्यंत कमी असल्याने ६८ रू/१० किलो भावाने कांदा विकावा लागला. २ एकरातील ३५ टन कांद्याचे २ लाख ३८ हजार रू. झाले.

मागे गावराण गवार २ एकर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने लावली होती. २० एप्रिल २०१४ ची लागवड निलम - ५१ वाण होता. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे ३ वेळा फवारली होती. तर माल भरपूर निघत होता. गवारीचा दर्जा देखील उत्तम होता. तेव्हा पाऊस कमी असल्याने तोडणीस मजूर सहज उपलब्ध होत होते. मंचर मार्केटला ५५ - ६० रू./किलो भाव आणि खेड (राजगुरूनगर) ला ४५ - ५० रू./किलो भाव मिळत होता. ही गवार १५ जुनला चालू होऊन १० तोडे (दिवसाड) झाले होते. तोड्याला १० - १२ पोती ५० किलोची माल निघत होता. २ एकरातून २।। लाख रू. झाले.

आता पर्यटन आणि उत्पन्न या दृष्टीने संत्रा आणि सिताफळाची लागवड करायची आहे. पुर्वी तळेगाव ढमढेरे, रांजणगाव, शिक्रापूर ही संत्र्याची उत्पादन केंद्रे होती. परंतु येथे नियोजन कमी पडले. एम.आय.डी.सी. मुळे प्रदुषणाचा प्रादुर्भाव होऊ लागला. नदी व कॅनॉलचे पाणी दिले तर ते थोडे प्रदुषित असल्याने फळगळ होते. फळगळीचा बागांना फटका बसला. विहीरीचे पाणी दिले तर उत्पन्न चांगले येते असा काही शेतकऱ्यांचा अनुभव आहे.