नोकरी करूनही 'सिद्धीविनायक' शेवगा देतो उत्पन्न - आय. टी. इंजीनिअर

श्री.अमित लोधी (सुदर्शन फार्म),
मु.पो. पारगाव, ता. दौंड, जि. पुणे,
मो. ९८८११२९७१०



३ वर्षापुर्वी आमच्या कंपनीने २५ एकर जमीन पारगाव (ता. दौंड) येथे घेतली होती. पाणी बोअरचे व २ विहीरीचे आहे. त्यामध्ये ८।। एकर ऊस, केशर आंब्याची बाग ३५ झाडे आणि चिकू असून उरलेल्या जमिनीत हंगामानुसार गहू, बाजरी घेतो.

यापैकी अर्ध्या एकरमध्ये 'सिद्धीविनायक' शेवग्याची १५० झाडे १।। वर्षापुर्वी ऑगस्ट २०१२ मध्ये लावली होती. त्या झाडांना नियमित सप्तामृताच्या फवारण्या घेत असे. तसेच कल्पतरू सेंद्रिय खत लागवडीच्यावेळी आणि नंतर फुले लागताना दिले होते. तर ५ फुट उंचीच्या झाडांना ६ महिन्यात प्रत्येक झाडाला ७० -८० शेंगा लागल्या होत्या. शेंगा २ फूट लांबीच्या होत्या. याची विक्री केडगाव मार्केटला केली. तेथे ३० ते ४० रू. किलो भाव मिळत होता. आठवड्याला तोडत होतो. साधारणपणे पहिल्या बहाराला झाडे लहान असूनही प्रत्येक झाडापासून एकूण सरासरी ५ ते ७ किलो शेंगा मिळाल्या. तर पहिल्या बहाराचे ३० हजार रू. झाले. दुसऱ्या बहाराचे देखील याचप्रमाणे ३० ते ३५ हजार रू. झाले.

सध्या बहार संपल्यावर छाटणी करून १५ दिवस झाले आहेत. याला जुलै २०१४ पासून तिसऱ्या बहाराच्या शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी झाडांचा विस्तार जास्त झाल्याने फुलकळी व लहान - लहान शेंगा भरपूर लागलेल्या आहेत. मी ऑफिसमध्ये नोकरी करीत असतानाच कंपनीने फार्मची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. आठवड्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी जाऊन ती पाहतो. कमी वेळ देऊन मजुरांवर अवलंबून असूनदेखील त्यामानाने चांगले उत्पादन मिळत आहे. त्यामुळे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवर समाधानी आहे.गवणीसाठी सप्तामृत औषधे घेऊन जात आहे.