कमी पाण्यावर ऊस व सोयाबीन अप्रतिम

श्री. धनराज अर्जुनराव बिरादार,
मु.पो. लोहारा, ता. उद्गीर, जि. लातूर,
मो. ९४२३३४०६०५


मी 'कृषी विज्ञान' मासिकाचा नियमित वाचक असल्यामुळे डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा नियमित वाचतो. त्या प्रेरणेतूनच मी आमच्या ऊस, सोयाबीन पिकांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहे. ८ महिन्याचा २ एकर ऊस आहे. ५ फुटाचा पट्टा असून २ डोळ्याच्या कांड्या जर्मिनेटरची बेणेप्रक्रिया करून ९ - ९ इंचावर आडव्या लावल्या तर जर्मिनेटर वापरल्यामुळे सर्व डोळे फुटून वाढ एकसारखी दिसत होती. पांढऱ्या मुळीचा जारवा देखील वाढला होता. लागणीच्या वेळी २ एकराला कल्पतरू सेंद्रिय खताच्या ७ बॅगा दिल्या होत्या. जमीन भारी काळी आहे. आमच्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. मात्र आम्ही बोअरच्या पाण्यावर ठिबक करून हा ऊस घेतला आहे.

उसाला जर्मिनेटरचे १ ते २ महिन्याला ड्रेंचिंग (आळवणी) करीत असतो. सुरूवातीच्या काळात जर्मिनेटर, थ्राईवर, प्रोटेक्टंट, प्रिझमच्या दर महिन्याला अशा तीन फवारण्या केल्या. बांधणीच्यावेळी २ एकराला कल्पतरू सेंद्रिय खत ९ बॅगा, सुपर फॉस्फेटच्या ३ बॅगा, निंबोळी पेंडीच्या ३ बॅगा असा डोस दिला, तर सध्या आठ महिन्यात ऊस फुटवे भरपूर असून १२ ते १५ कांड्यावर आहे. कांड्या जाड, पेऱ्यातील अंतर जास्त असून उसाची पाने रुंद, हिरवी पाहून गावातील लोक म्हणतात, तुमचा ऊस गावात १ नंबर आहे. इतरांचा ऊस कमी पाण्याने व्यवस्थित वाढला नाही. उसामध्ये तुटाळ दिसतेय. वाढे पिवळे पडून ऊस निस्तेज दिसतोय.

कोरडवाहू सोयाबीन ४ एकर केले आहे, यालाही जर्मिनेटरची बिजप्रक्रिया केल्यामुळे उगवण पाऊस कमी असतानाही चांगली झाली. पुढे २० - २० दिवसांनी ३ वेळा सप्तामृत फवारले. पावसाने ताण दिला तेव्हा उसाचे पाणी कमी करून स्प्रिंकलरच्या दोन पाण्यावर हे सोयाबीन अतिशय चांगले आले आहे. सोयाबीनला रोगकिडीचा प्रादुर्भाव फारसा जाणवला नाही. आता ह्या सोयाबीनच्या शेंगा टच भरल्या असून २० - २५ दिवसात म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात काढणीस येईल. जाणकार शेतकऱ्यांच्या मते एकरी १० क्विंटल पर्यंत उत्पादन मिळेल अशी पीक परिस्थती आहे.