तेल्यायुक्त ३ एकर बाग दुरुस्त होऊन कमी पाण्यात डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने खर्च १।। लाख, उत्पन्न ७ लाख

श्री. भटू महादू गुजर,
मु.पो. सोनगीर, ता.जि. धुळे,
मो. ९५७९८३०८७३



आम्ही जून २०१२ मध्ये ३ एकरमध्ये भगवा डाळींबाची लागवड केली आहे. जमीन मध्यम प्रतिची आहे. लागवड १२' x १०' वर आहे. अलिकडे पाऊसमान फारच कमी झाले आहे. गेल्या २ वर्षापासून (पहिला बहार धरल्यापासून) तर प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाळयात तुरळक पाऊस पडतो त्यामुळे दिवाळी पासूनच मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई भासते.

३।। एकरात तेल्या रोगाने झाडे त्रस्त खर्च १।। लाख, उत्पन्न १५ हजार

डाळींब पिकामधील स्वतःचा अनुभव नव्हता. त्यामुळे अनुभवी शेतकऱ्यांच्या सल्ल्यानुसार व्यवस्थापन करीत होतो. एरवी काही शेतकरी १।। ते २ वर्षात पहिला बहार धरतात. मात्र आम्हाला सांगण्यात आले की प्रथम झाडे सशक्त होऊ द्यात. म्हणून बहार धरण्यास घाई न करता २।। वर्षानंतर पहिला बहार धरला. बागेस ताण दिल्यांनतर जानेवारी २०१५ मध्ये पहिले पाणी दिले. १०:२६:२६, शेणखत, निंबोळी पेंडीचा बेसल डोसमध्ये वापर केला. नियमित रासायनिक औषधांच्या फवारण्या घेत होतो. झाडे सशक्त, बळकट असल्याने बहार चांगल्याप्रकारे फुटला होता. फळांचे सेटिंग होऊ लागले होते. मात्र याच अवस्थेत बागेवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. परिसरातील बागेवरही तेल्याचे प्रमाण कमी-जास्त होतेच. अनुभवी शेतकऱ्यांच्या व दुकानदारांच्या मार्गदर्शनानुसार रासायनिक औषधे फवारत होतो. मात्र रोगाचा प्रादुर्भाव एवढ्या झपाट्याने वाढत गेला की तो आटोक्यातच येईना. यामध्ये खर्च वाढत चालला होता. बाग छाटणी, शेणखत, रासायनिक खत, औषधांच्या फवारण्या असा १।। लाख रु. खर्च ३ एकराला झाला होता. एवढे होऊनही तेल्यारोग आटोक्यात न आल्याने फक्त १५ हजार रु. चे डाळींब विकले.

डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी सुयोग्य नियोजनाने उन्हाळ्यात अत्यंत कमी पाणी डाळींबास देऊन झाडावर २० -२५ किलो माल एकूण उत्पन्न ७ लाख खर्च १।। लाख

दुसऱ्या बहाराचे नियोजन नोव्हेंबर २०१५ मध्ये केले. त्यावेळी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे धुळे प्रतिनिधी श्री. किशोर निकम (मो. ९६६५००८८१८) यांची भेट झाली. त्यांनी डाळींबाबद्दल मार्गदर्शन करून डॉ.बावसकर तंत्रज्ञानाची सखोल माहिती दिली व तेल्यामुक्त उत्पादन घेता येऊ शकते. याची खात्री दिली. त्यानुसार चालू बहार डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने घेण्याचे ठरविले. बागेस नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये ताण दिला. दुष्काळी परिस्थितीमुळे बागेस चांगल्याप्रकारे ताण करून घेतली. त्यानंतर ३ एकराला (९०० झाडे) शेणखत ५ हजार रु. ट्रॉली प्रमाणे ६ ट्रॉली खत आणून दिले. त्याबरोबर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे कल्पतरू सेंद्रिय खत १ टन (१४ हजार रु. चे) आणून प्रतिझाड १ किलो दिले. त्यानंतर पहिले पाणी सोडले. नंतर जर्मिनेटरचे (एकरी १ लि. प्रमाणे) ड्रेंचिंग ठिबकद्वारे दिले. जर्मिनेटर, प्रिझम, थ्राईवरच्या दर १५ - १५ दिवसाला अशा दोन फवारण्या केल्या. त्यामुळे बाग अतिशय चांगल्याप्रकारे फटुली. नंतर फुलकळी लागतेवेळी थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंटच्या फवारण्या घेतल्या. त्यामुळे फुलकळी झाडे लालभडक दिसू लागली. शिवाय गळ न होता प्रोटेक्टंटमुळे मधमाश्यांचे प्रमाण वाढून परागीभवन चांगले झाल्याने सेटिंग व्यवस्थित होऊन झाडांवर १०० च्यावर फळे लागली.

डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे सप्तामृतातील या औषधांसोबत हार्मोनीचा वापरही तेल्या रोग येऊ नये म्हणून करत होतो. तसेच हवामानही गेल्यावर्षीच्या तुलनेत थोडे बरे होते. त्यामुळे बागेत तेल्याचा प्रादुर्भावावर लगेच नियंत्रण मिळविता येत होते. पुढे माल फुगवणीसाठी राईपनर, न्युट्राटोनच्या फवारण्या करत असे व ठिबकमधून ०:५२:३४ आणि ०:०:५० सोडत होतो. त्यामुळे अत्यंत कमी पाणी असतानाही फळांचे पोषण २५०, ३०० ते ४०० ग्रॅमपर्यंत झाले. फळांचा आकार जरी मध्यम प्रतिचा असला तरी कलर आकर्षक होता. उन्हाळ्यात पाणी फारच कमी होते. पाणी असते तर अजून फुगवण झाली असती. प्रत्येक झाडावरून २० - २५ किलो माल निघाला. यातील जो ३ टन माल ४०० ते ४५० ग्रॅम साईजचा होता ते ५५ रु./ किलो भावाने जागेवरून गेला. मात्र यामध्ये १७ टन माल मध्यम आकाराचाच होता तो ३५ ते ४० रु. ने गेला. यावर्षी बाजारभाव फारच कमी होते. तरी अत्यंत कमी पाण्यावर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने २० टन माल निघून त्यापासून ७ लाख रु. झाले. यासाठी बाग छाटणी ९ हजार, शेणखत ३०,००० डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी फवारण्या ४० हजार, इतर औषधे ३० हजार, कल्पतरू खत १४ हजार, विद्राव्य खते १० हजार व इतर २० - २५ हजार असा १।। लाख रु. खर्च वजा जाता ५.५ लाख रु. नफा मिळाला. या अनुभवातून चालू ऑक्टॉबर २०१६ पासूनच डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने बहाराचे नियोजन करणार आहे.