बाळानगर सिताफळ २।। एकर, उत्पादन १० टन , ३० ते ६० रु./किलो दर, एकूण ४ लाख

श्री. आण्णासाहेब मारुती म्हस्के,
मु.पो. जेऊर (हौ.), ता. नेवासा, जि. अहमदनगर.
मो. ९८९०५०३०५३


आम्ही गेली २ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करत आहोत. माझ्याकडे २।। एकर बाळानगर सिताफळ आहे. मध्यम प्रतिच्या जमिनीत १२' x १२' वर आहे. तर या सीताफळावर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा गेल्यावर्षी चांगला रिझल्ट मिळाल्यामुळे चालूवर्षी देखील याचा सुरुवातीपासून वापर केला. फेब्रुवारी २०१७ ला बागेस ताण दिला. त्यानंतर बागेस पाणी देण्यापुर्वी शेणखत, १०:२६:२६, सुक्ष्म अन्नद्रव्य यासोबत कल्पतरू खत प्रति झाडास ५०० ग्रॅम आणि निंबोळी पेंड ५०० ग्रॅम असा खताचा डोस दिला. त्यानंतर बागेला मार्चच्या सुरुवातीस पाणी दिले. त्यानंतर बागेला मार्चच्या सुरुवातीस पाणी दिले. त्यानंतर दुसरे पाणी देताना जर्मिनेटर आणि प्रिझम प्रत्येकी १ लि./ एकरी चे ड्रेंचिंग केले. तसेच जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम प्रत्येकी ५०० मिली/ १०० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. त्यामुळे झाडांची फूट वेगाने होऊन पाने हिरवीगार, सतेज निघाली. बाग चांगला फुटला. त्यानंतर थ्राईवर, क्रॉपशाईनर आणि प्रिझमची दुसरी फवारणी केली. तर कळी भरपूर लागली. मग उन्हाने फुलकळीची गळ होऊ नये तसेच फळ सेटिंग होण्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी १ लि. आणि प्रोटेक्टंट पावडर १ किलो + २५० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. त्याचा परिणाम चांगला जाणवला. कळीगळ फारच कमी झाली. तसेच प्रोटेक्टंटने मधमाशांचे प्रमाण बागेत वाढल्याने परागीभवन चांगल्याप्रकारे होऊन फळ सेटिंग झाले. झाडावर ५० ते ६० पासून ८० पर्यंत फळे लागली होती. त्यांचे पोषण होण्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर सोबत राईपनर आणि न्युट्राटोनच्या अशा ३ फवारण्या केल्या. तर फळांचे पोषण वाढले. २५० ग्रॅमपासून ५०० ग्रॅमपर्यंत फळांचे वजत भरत होते. यामध्ये ३०० - ४०० ग्रॅम वजनाच्या फळांचे प्रमाण अधिक होती. ही फळे जून सखेरीस चालू झाली, ती आज देखील (५ सप्टेंबर २०१७) चालू आहेत. आतापर्यंत सरासरी प्रती झाड १४ ते १५ किलो माल निघाला आहे. ही फळे अहमदनगर मार्केटमध्ये विकली. तेथे ३० रु. पासून ६० रु./किलो असा भाव मिळाला. सरासरी एकूण १० टन उत्पादन मिळाले. त्याचे ४ लाख रु. झाले.

सुपर भगवा ६ एकर, पहिलाच बहार १।। वर्षात २५ ते ३० फळे, डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या नियमित वापराने सर्व 'ए' ग्रेड मिळतील.

सिताफळाप्रमाणे आम्ही जानेवारी २०१६ मध्ये लावलेल्या सुपर भगवा डाळींबाला देखील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरली. एकूण ६ एकरमध्ये १२' x १२' वर जवळपास १८०० झाडे आहेत. ह्या डाळींबाला सुरुवातीपासून डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरल्यामुळे झाडांची वाढ जोमाने झाली होती. त्यामुळे त्याचा जून २०१७ मध्ये मृगबहार धरला. प्रथम शेणखतासोबत कल्पतरू सेंद्रिय खताचा प्रतीझाड ३०० - ४०० ग्रॅम याप्रमाणे वापर केला. तसेच जर्मिनेटरचे ड्रेंचिंग करून बागेस फुटीसाठी प्रिझम फवारले. तर यावर बाग एकसारखा फुटला. पुढे कंपनी प्रतिनिधी श्री. रूपवणे (मो. ८८०५३११४५४) यांनी सांगितल्याप्रमाणे व डाळींब पुस्तकात दिलेल्या माहितीच्या आधारे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर चालू आहे. हा पहिलाच बहार असल्याने प्रत्येक झाडावर २५ ते ३० फळे धरली आहेत. फळे पोषणासाठी आतापर्यंत थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोनच्या २ फवारण्या झाल्या आहेत. तसेच विद्राव्य खताचा वापर चालू आहे. सध्या ही फळे २५० ते ३०० ग्रॅमची असून पक्वतेसाठी अजून १ महिन्याचा कालावधी आहे. तोपर्यंत अजून २- ३ फवारण्या डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या करून दर्जा निश्चितच 'ए - १' मिळेल अशी खात्री आहे.