जुन्या संत्रा बागेचे २ लाख तर लिंबू बागेचे ८० हजार

श्री. नरसिंग नारायणराव पलांडे,
मु. पो. मुखई, ता. शिरूर, जि. पुणे,
फोन नं. (०२१३८) २७८२३


मी पिंपरीधुमाळ येथे ४० वर्षे शिक्षकाची नोकरी केली. आता निवृत झाल्यामुळे शेती पाहतो. सध्या माझ्याकडे संत्रा, लिंबू, सिताफळ ही फळझाडे आणि मेथी, कोथिंबीर, कांदा ही पिके करतो. भाजीपाल्यापेक्षा फळझाडाकडे जास्त लक्ष देतो. संत्री ४ एकर १८ वर्षापुर्वी लावली आहे. संत्री, लिंबाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरली होती. तर संत्रीपासून एकरी २ लाख रुपयेचे उत्पादन निघाले. तर लिंबापासून ८० हजार रुपये एकरी मिळतात. दर वर्षी प्रत्येक झाडाला २५ किलो शेणखताचा डोस देतो. संत्र्याचा वर्षातून एकाच हस्त नक्षत्राचा बहार धरतो. म्हणजे फुल लागते. त्यानंतर १० महिन्यात फळे उतरीला (काढणी) येतात. त्यामुळे झाडांना उन्हाळी पाणी मिळते. झाडे चांगली राहतात. पाणी उपलब्ध असल्यामुळे हे शक्य होते. हस्त नक्षत्राच्या बहराने झाडांचे आयुष्य वाढते. माझा १८ वर्षाचा बाग असून देखील भरपूर उत्पन्न देत आहे. बहार धरल्यानंतर फुल निघण्यापुर्वी म्हणजे श्रावण भद्रपद च्या दरम्यान उत्तरा नक्षत्रात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी केल्यामुळे फुल भरपूर निघते आणि हस्त नक्षत्राचा बहार चांगला निघतो.

दुसरी फवारणी संत्र्याच्या गाठी (हरभऱ्या एवढ्या) झाल्यावर करतो. त्यामुळे गळ होत नाही. नंतर ३ महिन्यांनी लिंबाएवढी फळे झाल्यावर तिसरी फवारणी करतो. त्यामुळे फळे मोठी होतात तसेच गोडी वाढते. फळे उत्कृष्ट दर्जाची, तेजदार मिळतात. नंतर फवारणी करत नाही. या तीन फवारण्यावरच माल काढणीला येतो. फळे चांगली आल्यामुळे भाव चांगला मिळतो. माल विक्रीला जूनमध्ये येतो. दोन महिने माल चालतो. माल पुणे मार्केटला पाठवितो. ५० ते ६० रू. डझनला भाव मिळतो. माल विक्रीला जूनमध्ये येतो. दोन महिने माल चालतो. माल पुणे मार्केटला पाठवितो. ५० ते ६० रू. डझन ला भाव मिळतो. एकरी २ लाख रुपये मिळतात. याचप्रमाणे लिंबालाही फवारण्या करतो आणि चांगले उत्पादन घेऊन त्यापासून एकरी ८० ते ९० हजार रू. वर्षाला मिळतात.