१।। एकर खरबुजापासून ४ लाख

श्री. अंकुश बापू खोपणे,
मु. पो. पिंपळखुंटे, ता. माढा, जि. सोलापूर.
मोबा. ९६०४०४७३६६



माझी १।। एकर जमीन असून त्यामध्ये बॉबी खरबूजाची लागवड ६' x २' वर केली. श्रीराम कृषी केंद्र कुर्डुवाडी येथून ८ पाकिटे ५० ग्रॅमची व जर्मिनेटर घेवून गेलो. खरबुजाच्या बियाणांना जर्मिनेटर ची बीजपक्रिया करून लागवड केली. त्याच बरोबर मी जर्मिनेटरची एकरी १ लि. याप्रमाणे आळवणीही केली. त्यामुळे उगवण क्षमता ९०% झाली. २ - ३ पानावरती वेळ झाल्यानंतर पहिली फवारणी जर्मिनेटर ५० मिली + थ्राईवर ५० मिली + क्रॉंपशाईनर ५० मिली + हार्मोनी २० मिली प्रति पंपास घेऊन फवारणी केली. त्यानंतर ८ ते १० दिवसांनी दुसरी फवारणी वरीलप्रमाणेच केली व ह्याच बरोबर १९:१९:१९ ड्रीपद्वारे एकरी ३ किलो ह्याप्रमाणे ३ ते ४ दिवसाच्या अंतराने ३ वेळेस सोडले. यामुळे खरबुजाच्या वेलाची वाढ जोमाने होऊ लागली. त्यानंतर १० ते १५ दिवसांनी थ्राईवर ५० मिली + क्रॉंपशाईनर ५० मिली + प्रोटेक्टंट - पी ५० ग्रॅम ह्याप्रमाणे केली. त्यामुळे प्लॉट १ नंबरचा होता. माल मोठा झाला होता. फळे काढणीपर्यंत पाने एकदम चांगली होती. पण जुलै महिन्यात पाऊस चालू झाला. त्यामुळे ५०० कॅरेट माल बाद झाला तरी १००० कॅरेट माल चांगला राहिला. वाशी मार्केटला मालाची विक्री केली. एकूण ४ लाख रू. झाले.