दुभत्या जनावरांच्या चारापिकांना दर्जेदार दुधासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

श्री. वसंत रामचंद्र लोणारे,
मु.पो. भोसे, ता. खेड, जि. पुणे.
मोबा. ९०११४९९५१६


सन २००४ पासून दुग्धव्यवसाय चालू केला आहे. सुरूवातीला घरगुती साध्या २ म्हशी आपल्याकडे होत्या. त्याचे दूध गावामध्येच शिक्षक, डॉक्टर, वकील अशा नोकदार मंडळींना घालत होतो. दुधाचा दर्जा उत्तम असल्याने हळूहळू मागणी वाढू लागली. नंतर दूध उत्पादन वाढण्यासाठी जातीवंत दिल्ली, म्हैसाळ, मुऱ्हा जातीच्या म्हशी कच्छवरून आणल्या. या म्हशी सकाळी ८ लि. आणि संध्याकाळी ८ लि. दूध देतात.

चाऱ्यासाठी (३ वर्षीय) लसूण घास १ एकर, मारवेल २० गुंठे, यशवंत (राहुरी विद्यापीठाचा) १ एकर क्षेत्रामध्ये केला आहे. तसेच १ - १ एकरचे स्वीटकॉर्नचे पीक घेतो. स्वीटकॉर्नला बाजार चांगले असले तरच कणसे विकतो व चारा म्हशींना देतो. भाव नसल्यास कणसासह चारा म्हशींना घालतो. यशवंत चारा पीक ८ ते १० फुटापर्यंत वाढते. ११ म्हशींच्या चाऱ्यासाठी ३।। ते ४ एकर क्षेत्र लागते.

सकाळी ६.०० ते ६.३० वाजेपर्यंत दूध काढतो. दूध काढल्यानंतर खुराक व चारा देतो. ११.०० वाजता पाणी पाजून पुन्हा चारा देतो. तो खाऊन ५ वाजेपर्यंत म्हशी विश्रांती घेतात. या वेळेत त्या चांगल्याप्रकारे रवंथ करतात. त्यामुळे चाऱ्याचे दुधात रूपांतर होते. म्हशींना दिवसाला २० किलो हिरवा चारा, १० किलो वाळलेला (सुका) चारा आणि २ किलो सकाळी व २ किलो संध्याकाळी खुराक देतो.

म्हशी व्याल्यानंतर ३ महिन्यांनी पुन्हा माजावर येतात. गोठ्यात मुऱ्हा जातीचा १ हाल्या पाळला आहे. म्हशी लागवड झाल्यावर त्या उलटू नये म्हणून पशुवैद्यकांमार्फत इंजक्शन दिले जाते. त्यानंतर ३ महिन्यांनी तपासणी करून गाभण असल्याची खात्री करतो. ७ महिन्याच्या गाभण असेपर्यंत दूध काढतो. नंतर दूध खारट (चीकयुक्त) निघू लागताच त्या आटवतो. ३ महिन्याचा म्हशींचा भाकड काळ राहतो. या काळात म्हशींना कॅल्शियम खुराकमधून देतो. त्याने म्हशींची शारीरिक झीज भरून निघते.

सरासरी दररोज १२० ते १३० लि. दूध निघते. दुधाच्या क्वॉलिटीबाबत तडजोड नसते. १ जानेवारीला दरवर्षी प्रति लिटर दुधाला ५ रू दर वाढवितो. सध्या ५० रू./लि. दराने चाकणमध्ये विशाल गार्डन सोसायटीत दुधाची विक्री पिशवी पॅकिंग (५०० मिली व १ लि. असे) करून विक्री करतो. प्रत्येक गिऱ्हाईकाकडून ५ हजार रू. अॅडव्हान्स घेतो. १०० लि. दूध घालून झाल्यानंतर पुन्हा ५ हजार रू. अॅडव्हान्स त्यांच्याकडून घेतो. दुधाचा दर्जा पाहून मागणी वाढली आहे. आज मितीस दररोज २४० लि. दुधाची मागणी आहे. त्यापैकी ५०% च दूध उत्पादन आपल्याकडे होते. म्हणून शेजारच्या दूध उत्पादकांना सांगितले की, तुम्हाला डेअरीला म्हशीच्या दुधाला २६ रू./लि. भाव मिळतो तर मी ३० रू./लि. भाव देतो. पण दुधात पाणी अजिबात घालायचे नाही. असे खात्रीशीर लोकांकडूनच दूध घेऊन ते पुरवतो.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा चारा पिकांना वापर करतो. त्यामुळे कमी कालावधीत चाऱ्याची वाढ होऊन पौष्टिक चारा उपलब्ध होतो आणि ह्या चाऱ्यामुळे म्हशीच्या दुधाची फॅट वाढते. त्यामुळे घट्ट, स्वादयुक्त, चवदार दूध उत्पादन मिळते.

आता सरांच्या 'सिद्धीविनायक' शेवग्याची १ हजार झाडे लावणार आहे. पुर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने शेवग्याचे उत्पादन घेणार आहे. यासाठी सर सांगतील त्या - त्या वेळी सप्तामृत व कल्पतरू सेंद्रिय वापरणार आहे. ७ महिने ही झाडे सांभाळल्यानंतर १ हजार झाडांपासून आठवड्यातून १ वेळा कमीत कमी १ टन उत्पादन सहज मिळून त्याला सरासरी २५ रू./किलो भाव मिळाला तरी महिन्याला ४ टनाचे १ लाख रू. प्रती महिना उत्पादन चालू होईल. आम्ही कोणतेही पीक किंवा व्यवसाय निवडण्यापुर्वी त्याचा सखोल अभ्यास करून मगच ते सुरू करतो.

मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा १९८५ सालापासून वापर करीत आहे. १९८५ साली आमच्या भागात पाणी कमी होते. त्यामुळे नाशिकच्या पाहुण्यांच्या शेतीत अर्धोंलीने स्टॅटीस डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने लावला. ते पीक उत्कृष्ट येवून मार्केटमध्ये फुले गेल्यावर श्री. छेडा यांचे पॉलिहाऊसमधील स्टॅटीसपेक्षा उत्तम दर्जाची असल्याने ज्यादा भावाने विक्री झाल्यावर त्यांनी विचारले, तुमचे पॉलिहाऊस कुठे आहे? यावर मी त्यांना सांगितले हा स्टॅटीस ओपन प्लॉटमधील आहे. तेव्हा त्यांना आश्चर्य.