रमजानला २ एकरातील खरबुजापासून निव्वळ नफा ४।। लाख

श्री. बाजीराव बबनराव भोसुरे,
मु.पो. धानोरे, ता. शिरूर, जि. पुणे,
मोबा. ९८८११७६६९०



आम्ही दरवर्षी खरबुज डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने लावतो. खरबुजाचे पीक असे आहे की ते द्राक्ष पिकाला भारी पडते. ३ महिन्याच्या ह्या पिकापासून एकरी ३ लाख रू. उत्पन्न मी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने घेतले आहे. फक्त ह्या पिकाच्या बाबतीत असे आहे की, दिवसातून किमान सकाळी १ तास आणि संध्याकाळी १ तास प्लॉटवर गेले पाहिजे. पीक परिस्थिती पाहून रोग - किडीच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण करून त्यावर लागलीच उपाययोजना करावी लागते. अन्यत: प्लॉट जागेवर बसतात. तसेच एकरी १ ते १। लाखापर्यंत एवढा खर्च करावा लागतो.

मी खरबूजाच्या बियाला जर्मिनेटरची प्रक्रिया करण्यापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतो. त्यामुळे उगवण ६ ते ७ दिवसात हमखास १००% होते. त्यानंतर १५ ते २० दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, आणि प्रोटेक्टंट प्रत्येकी ५०० मिलीची १५० लि. पाण्यातून फवारणी करतो. त्यामुळे वेळ वाढीस लागतात.

खरबुजावर मुख्यत: तुडतुडे, भुरी, करप्याचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या दोन फवारणीमध्ये एकदा किटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी घेतो. त्यामुळे रोग - कीड आटोक्यात राहते व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृतामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढून वेल झपाट्याने वाढतात. पुढे फळे लागल्यावर थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. ची २०० ते २५० लि. पाण्यातून दोन वेळा फवारणी करतो. तेवढ्यावर पीक ७५ दिवसात काढणीस येते. वेलावर २ ते ३ फेल असतात. शक्यतो दोनच धरतो. तर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या राईपनर, न्युट्राटोनमुळे फळांचे पोषण अधिक होऊन वजन व गोडी वाढते. फळाचे वजन २।। ते ३ किलो भरते.

चालू वर्षी रमजान पकडण्यासाठी मे २०१४ च्या पहिल्या आठवड्यात २ एकरमध्ये कुंदन खरबुज बेडवर लावले. प्रथम बेड तयार करताना शेणखत एकरी ३ ट्रोली, कल्पतरू खत २ बॅगा, सुपर फॉस्फेट ८ बॅगा, पोटॅश २ बॅगा मातीत मिसळून देऊन ड्रीपलाईन अंथरले व ते बेड मल्चिंग पेपरने झाकून घेऊन ड्रीप लाईनच्या दोन्ही बाजूस ६" - ६" अंतरावर १ बी टोकले. अशाप्रकारे बेडवर २ ओळी बसविल्या. ओळीतील झाडाचे अंतर १।। फुट होते व बेडमधील अंतर ८ फूट होते. एकरी कुंदन खरबुजाची १० ग्रॅमची २० पाकिटे बियाणे जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून टोकले तर ६ व्या दिवशी उगवण झाली. त्यानंतर प्रत्येक ८ ते १० व्या दिवशी सप्तामृत फवारणी व किटकनाशक, बुरशीनाशकाची आलटून पालटून फवारणी करत होतो. त्यामुळे रोग - किडीचा प्रादुर्भाव झाला नाही. वेलांची वाढ चांगली झाल्याने प्रत्येक वेलीवर २ ते ३ फळे धरली. फळे पोसण्यासाठी, वजन वाढीसाठी, गोडी व स्वद्युक्त चवीसाठी थ्राईवर, क्रॉपशाईनरसोबत राईपनर, न्युट्राटोनचे २ फवारे केले. त्यामुळे फुगवण उत्तम होऊन फळे २, २।। ते ३ किलो वजनाची मिळाली. २० जुलै २०१४ ला रमजानमध्ये फळे चालू झाली. आठवड्याभरात रमजानबरोबरच फळे संपली. तर २ एकरातून ३२ टन माल निघाला. त्याला २० ते २२ रू. किलो भाव मिळाला. २ एकरातून ६ लाख रू. मिळाले. खर्च १।। लाख रू. वजा जाता ४।। लाख रू. निव्वळ नफा ३ महिन्यात २ एकरातून मिळाला.

यंदा कांद्याचे बियाचे शॉर्टज असल्याने पाहुण्यंकडील गेल्यावर्षीचे जुने बी आणले आहे. त्यांनी त्यातील काही बी टाकले होते मात्र ते उगवले नाही. तरीही आम्ही ते बी आणले आहे. आम्हाला जर्मिनेटरचा अनुभव असल्याने जर्मिनेटरने ते बी उगवेल अशी खात्री आहे. त्यासाठी आज १२ ऑगस्ट २०१४ रोजी जर्मिनेटर घेण्यास आलो आहे.