शेवग्याचे अनुभव वाचून 'सिद्धीविनायक' शेवग्याची यशस्वी लागवड

श्री. तानाजी विठ्ठलराव जाधव,
मु.पो. तुतोरी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद.
मोबा. ९९७०५५५८७६



माझी 'सिद्धीविनायक' शेवग्यावरील मुलाखत 'कृषीविज्ञान' जुलै २०१४ च्या अंकात प्रसिद्ध झाल्यानंतर मला मंगळवेढा, पंढरपूर, करमाळा, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, तुळजापूर येथून शेतकऱ्यांचे फोन आले. ते विचारू लागले की, कोठून बी आणले ? कोणती औषधे फवारली. त्यावर मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी येथून बी आणले. तसेच सरांची सप्तामृत औषधे वापरली असे सांगितले.

२५ मे ते ३० मे २०१४ या काळात शेवग्याची खरड छाटणी केल्यानंतर ४५ दिवसात फुले लागली आहेत. हा दुसरा बाहर आहे. याला जर्मिनेटरचे ड्रेंचिंग करून जर्मिनेटर, थ्राईवरची १ फवारणी केली होती.

एकूण ८ एकर जमीन आहे. त्यापैकी ४ एकरमध्ये ऊस आहे. ३२ गुंठे हा 'सिद्धीविनायक' शेवग्याचा प्लॉट आहे. १ एकर रिकामे रान सप्टेंबरमध्ये अजून 'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीसाठी ठेवले आहे. बाकी २।। एकर रानात ज्वारी व हरभरा करणार आहे. पाणी १ विहीर आणि १ बोअरचे आहे.

'कृषी विज्ञान' मासिक मार्च २०१३ मध्ये माझ्या वाचण्यात आले त्यानंतर त्यातील शेवगा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलाखती वाचण्यात आल्या. त्या शेतकऱ्यांना फोन करून 'सिद्धीविनायक' शेवग्याबद्दल खात्री केली. त्यानंतर मला समजले की शेवग्याच्या जवळपास २०० जाती आहेत. त्यापैकी 'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड केली. तर उत्पादन व शेंगांची चव पाहून या सर्व जातीत ही 'सिद्धीविनायक' जात श्रेष्ठ असल्याचे जाणवले. जवळपास १०० शेतकऱ्यांनी या शेवग्याच्या प्लॉटला भेट दिली आहे. आल्यानंतर बागेची पाहणी करतात. शेंगा खाण्यास नेतात. त्यानंतर बरेचशे पुन्हा शेंगा नेण्यास येतात व ते सांगतात की, या शेवग्याची शेंग अतिशय चविष्ट आहे.