२।। एकर डाळींबापासून पहिल्या बहाराचा दीड लाख नफा

श्री. मधुकर माणिक पठारे,
मु. पो. वाळवणे, ता. पारनेर, जि. अहमदनगर



माझ्याकडे १५ एकर हलक्या - मध्यम प्रतिची जमीन आहे. त्यामधील ५ एकरमध्ये जून २००३ ला भगवा डाळींबाची लागवड १४' x १२' वर केली आहे. लागवडीच्यावेळी कंपोस्ट खत, शेणखत तसेच थोडे सिंगल सुपर फॉस्फेट टाकून खड्डे भरून रोपांची लागवड केली. ही रोपे ३॥ वर्षाची झाल्यानंतर डिसेंबर २००८ मध्ये मोशी (पुणे) येथील किसान प्रदर्शनास भेट देत असताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या स्टॉंलवर भेट दिली. तेथून डाळींब पुस्तक नेऊन घरी गेल्यानंतर सविस्तर वाचन केले.

डिसेंबर २००८ मध्ये २॥ एकर डाळिंबाचा बहार धरला होता. जानेवारी अखेरीस नुकतीच कळी निघण्यास सुरुवात झाली होती. म्हणून त्यावेळेस जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी १ लि. घेऊन गेलो. त्याची ३०० लि. पाण्यातून फवारणी केली. त्याने कळी एकदम एकसारखी सर्व झाडांना निघाली. त्यामुळे नंतर दुसरी फवारणी मार्चमध्ये सप्तामृत औषधांची केली. त्याने फळांचे सेंटिग होऊन फळे पोसण्यास सुरुवात झाली. एप्रिल २००९ मध्ये फळे संत्र्याच्या आकाराची असताना सप्तामृत औषधे जवळ उपलब्ध न झाल्येन फवारणी घेऊ शकलो नाही. विहीर बागायत असल्यने उन्हाळ्यात पाण्याची कमतरताअसतानाही फळांचे समाधानकारक पोषण झाल्याने १५ मे २००९ मध्ये पहिला तोड केला. फळे ३०० ते ४५० ग्रॅमची मिळाली. पहिल्या तोड्याची फळे अहमदनगर मार्केटला १००० रू. शेकडा प्रमाणे विक्री केली. असे ५ - ६ तोडे झाले. आज १७ जुलै २००९ शेवटच्या तोड्याचा माल पुणे मार्केटला आणला होता. मे. कुंजीर यांच्या गाळ्यावर ४० ते ५० रू. किलो प्रमाणे विक्री झाली. या अडीच एकर डाळींबापासून खर्च वजा जाता दीड लाख रू. झाले. या अनुभवावरून उरलेल्या २॥ एकर क्षेत्रावरील डाळिंबाचा बहार डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने धरणार आहे.