एक डोळा लागणीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फारच फायदेशीर

श्री. दिलीप रघुनाथ देसाई ,
मु.पो. आणे, ता. कराड, जि. सातारा,
मोबा. ९६६५९०९८५१


माझ्या ३.५ एकर रानापैकी २० गुंठ्यावर दि. ०५/०७/२०११ ला मी उमेश कापसेंच्या सल्ल्यानुसार उसाच्या कांड्या जर्मिनेटरमध्ये बुडवून लावल्या. त्यासाठी मझ्याकडच्या २० लिटरच्या ड्रमात ३०० मिली जर्मिनेट + पाव किलो प्रोटेक्टंट + बाविस्टीन २० ग्रॅम टाकून त्यात १० मिनिटे को - ८६०३२ या जातीच्या उसाच्या कांड्या बुडवून ठेवल्या. खर तर एक डोळ्याची कांडीच मी लावायचो, तर दली (नांग्या) खूप पडायच्या. यावेळी तर एक डोळ्याची कांडी एक फुटावर लावायची होती. तरीपण कापसे यांच्यावर विश्वास असल्यामुळे हे धाडस केलेच. सुरवातीला १ - १।। फुटावर सिंगल सुपर फॉस्फेट टाकून घेतले. त्यावर १ - १ डोळा वर करून लावला. साधारण २० गुंठ्याला १५ मोळ्या लागल्या. प्रत्येक असाला १८ -२० पर्यंत डोळे होते. ३।। फुटाची सारी व १।। फुटावर डोळा याप्रमाणे ४१४८ डोळे लागणार असल्याचे आधीच कापसे यांनी सांगितले होते. त्यानुसार नियोजन केलं होते. यंत्रणा आधीच तयार होती. लावणीला ५ माणसं लागली. बेणे प्रक्रियेचे काम थोड किचकटच वाटत होतं पण बेणे कमी, माणसं कमी त्यामुळे परवडणारं होतं. महिन्याभरात लागण एकसारखी उगवून वर आली. त्याला प्रत्येक पंपास जर्मिनेटर १०० मिली. + प्रिझम ३० मिली. + बाविस्टीन २० ग्रॅम याप्रमाणे आळवणी घातली. पंधरावड्यातच फुटवा चांगला दिसायला लागल्यावर युरिया १ पोते + मेग्नेशियम सल्फेट २५ किलोचा एक डोस दिला. ऊस हिरवागार जोमाने वाढलाच शिवाय पानाची रुंदीपण चांगली झाली. त्यानंतर साधारण महिन्याभरात जर्मिनेटर ६० मिली + थ्राईवर ५० मिली + प्रिझम ४० मिलीची प्रती पंपास याप्रमाणे फवारणी घेतली. एवढ्यावरच ऊस चांगलाच उचलला (वाढला)

साधारण २५ दिवसांनी परत एकदा जर्मिनेटर ७० मिली + थ्राईवर ६० मिली + प्रिझम ५० मिली + राईपनर ५० मिलीची फवारणी घेतली. पाने चांगलीच रुंद झाली. त्यावर आणखी एक खताचा डोस दिला. तेवढ्यावरच ऊस कुळवायला आला. कुळवताना डीएपी - पोटॅश - मॅग्नेशियम सल्फेट, युरिया, कॅल्शिमॅक्सचा संतुलित डोस कापसे यांच्या सल्ल्याने घातला. कल्पतरू वापरायचे होते पण ते लांब कोल्हापूरला असल्याने आणायची सोय झाली नाही त्यामुळे त्याऐवाजी इतर सेंद्रिय खत वापरले. कुळवल्यावर पंधरावड्यात आणखी एक फवारणी सप्तामृत औषधांची केली. माझ्या अपेक्षेपेक्षाही चांगला ऊस झाला. सध्या पाला सोलून सरीत टाकून त्यावर रासायनिक खतांचा डोस टाकला आहे. ऊसाची जाडी, पानाची रुंदी समाधानकारक आहे. एकंदर माझ्या आजवरच्या उसापेक्षा यावर्षीचा ऊस अतिशय चांगला (संदर्भ: कव्हरवरील फोटो) असून गुंठ्याला २ टन उतारा पडेल अशी अपेक्षा आहे. सर म्हणतात, "गुंठ्याला ३ टन उतारा पडायला हवा."