दर्जेदार, चमकदार हरभरा एकरी १० क्विंटल त्यामुळे सोयाबीन कापसास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरणारच

श्री. सुनिल नारायण वाठोरे, मु.पो. ब्राम्हणगाव, ता. उमरखेड, जि. यवतमाळ - ४४५२०६.
मो. ७८७५५०१८७९


माझ्याकडे वडिलोपार्जीत ५ एकर जमीन आहे. मी मुख्यत्वे करून कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर अशी पिके घेत असतो. मी आतापर्यंत डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर केला नव्हता, पण या वर्षी आमच्या भागातील कंपनी प्रतिनिधींची भेट झाली असता त्यांनी मला तम्ही आतापर्यंत जी काही औषधे वापरली त्यापेक्षा थोडेसे या वर्षी वेगळे करून पहा असे सांगितले.

त्यावरून मी यावर्षी २ एकर हरभरा या पिकावर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. यासाठी सुरवातीला पेरणीच्या अगोदर एकरी १०० किलो कल्पतरू खत टाकले. त्यानंतर बिजप्रक्रिये करीता जर्मिनेटर + प्रिझम + बाविस्टीनचा वापर केला असता उगवण चांगल्याप्रकारे होऊन झाडांची एकसमान, निरोगी वाढ झाली. तसेच पांढऱ्या मुळ्यांची संख्या भरपूर प्रमाणात वाढली. नंतर १५ दिवसांनी मी जर्मिनेटर + प्रिझम + क्रॉपशाईन + थ्राईवर + हार्मोनी + प्रोटेक्टंट + स्प्लेंडरची फवारणी केली असता हरभरा या पिकात मर, मुलकुजव्या, करपा हे रोग आले नाहीत. तसेच पावसाळ्यात पाऊस कमी झाला असल्यामुळे कमी पाण्यावर सुद्धा या पिकाने तग धरून मर न लागत एकसमान असा हिरवागार हरभरा दिसत होता. बाकीच्या लोकांना हरभऱ्यात मर लागलेली कमी होत नव्हती. तसेच आपल्या शेड्युलप्रमाणे मी तीन फवारण्या केल्या आणि शेवटी दाणे भरण्याच्या काळात न्युट्राटोन + क्रॉपशाईनर + थ्राईवर + राईपनरच्या दोन फवारण्या केल्या असता मला एकरी १० क्विंटल हरभरा झाला आहे. माझ्या शेतातल्या हरभऱ्याला जशी चकाकी आहे तशी आमच्या शेजाऱ्याच्या हरभऱ्याला चकाकी नव्हती. या अनुभवातून मी चालूवर्षी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे सोयाबीन, कापूस या पिकावर वापरत आहे.