डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने पपईचा रोग गेला म्हणून कापसास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी

श्री. तुकाराम नागनाथ टेकाळे,शारदानगर, परळी (वैजनाथ), जि. बीड - ४३१५१४.
मो. ९७६६९९०२५४


नमस्कार, माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी (अॅग्रो) प्रा. लि. पुणे यांचे प्रोडक्ट वापरून पपईवरील व्हायरस कसा आटोक्यात आणला हे खालील लेखामध्ये सांगू इच्छितो.

मी तुकाराम नागनाथ टेकाळे. माझी नागपूर येथे २।। एकर जमीन आहे. त्यातील १।। एकर क्षेत्रात मी १५ एप्रिल २०१७ रोजी पपई लागवड केली आणि बाकीच्या जमिनीमध्ये आंबा, कापूस, चिकू ही पिके आहेत. मात्र पपई लागवडीनंतर १।। महिना झाल्यावर व्हायरसचा प्रादुर्भाव झाला. त्याने झाडे पिवळी व निस्तेज झाली. मी पपईच्या व्हायरसने फार त्रासलो होतो. व्हायरस नियंत्रणासाठी रासायनिक औषध फवारली, मात्र त्याने पपईवरील व्हायरस कमी होत नव्हता. दिवसेंदिवस व्हायरस वाढतच होता. या दरम्यान माझी भेट डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी (अॅग्रो) प्रा. लि. पुणे यांचे कंपनी प्रतिनिधी सय्यद फिरोज (मो. ९१६८२११३७६) यांच्याशी झाली. मी त्यांना माझा हा प्लॉट दाखवला व त्यांनी मला जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन ही औषधे पपईला फवारणीसाठी दिली व ड्रेंचिंगसाठी जर्मिनेटर सुक्ष्म अन्नद्रव्य दिले. मी ही औषधे आणून स्प्रे व ड्रेचिंग केले. तर मला पहिल्या स्प्रेमध्ये ३० ते ३५ % रिझल्ट जाणवला व नंतर मी त्यांना लगेच फोन करून सांगितले की व्हायरस आटोक्यात येत आहे. त्यानंतर मी त्यांच्या मार्गदर्शनानुसार १५ - १५ दिवसाच्या अंतराने स्प्रे नियमित करत राहिलो. त्यामुळे पपई पूर्ण व्हायरमुक्त होऊन आज ४ महिन्याचा माझा पपई प्लॉट नंबर एक आहे. सध्या फुलकळी लागून काही झाडांना फळे देखील लागली आहेत. तरी फुले व फळांची गाळ होऊ नये व फळांचे पोषण होण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या पुढील फवारण्या चालू आहेत.

या पपईच्या अनुभवातून मी कापसासाठी पण कॉटन थ्राईवर व प्रिझम फवारले. तर माझ्या कापसाची वाढ होऊन पाने व फुलकळी टिकून राहिली. आता मी कल्परू सुद्धा वापरणार आहे. मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो एकवेळ अवश्य डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे वापरून बघा.