टोमॅटोपासून १।। ते २ महिन्यात १ लाख १० हजार!

श्री. सिद्धेश्वर आण्णाप्पा उमरदंड,
मु.पो. मार्डी, ता.उ. सोलापूर, जि. सोलापूर


मे २००७ मध्ये ३० गुंठे टोमॅटो (लक्ष्मी - ५००५) ची लागवड होती. रोपे तयार करताना जर्मिनेटर २० मिली २५० मिली पाण्यामध्ये घेऊन त्यामध्ये बियाणे २ तास भिजत ठेवले. नंतर बी सावलीत सुकवून टाकले. तर आठवड्यात पुर्ण उगवण झाल्याचे जाणवले. हे रोप १ महिन्याचे झाल्यानंतर लागवड केली. १० लिटर पाण्यामध्ये २५० मिली जर्मिनेटर घेऊन त्यामध्ये रोपे बुडवून लागवड केली असता नांगी पडली नाही. रोपे लगेच उभी राहून सुकवा अजिबात जाणवला नाही. नंतर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर प्रत्येकी २ लिटर घेऊन गेलो. कृषी विज्ञान अंकामध्ये दिलेल्या प्रमाणानुसार प्लॉट दीड महिन्याचा फवारणी आणि दोन - अडीच महिन्याचा असताना एक फवारणी केली.

एवढ्यावर पिकाची जोमदार वाढ झाली. फुटवा वाढला, फुलकळी व फळधारणाही नेहमीपेक्षा जादा होती. टोमॅटोचा तोडा ऑगस्ट २००७ मध्ये चालू झाला. दररोज २५ क्रेट माल काढून सोलापूर भाजी मार्केटला श्री. पाटील दलाल यांच्याकडे विक्रीसाठी पाठवित होतो. मार्केटमध्ये सर्व साधारण ८० -९० रु./१० किलो भाव असताना आम्हाला १०० - ११० रु. भाव मिळत असे. फळे कडक वजनदार व आकर्षक असल्याने हा भाव मिळत असे. या टोमॅटोपासून माल चालू झाल्यापासून दीड दोन महिन्यात खर्च वजा जाता १ लाख १० हजार रु. मिळाले. 'कृषी विज्ञान' मासिकाची मागील वर्गणी संपल्याने आज चालू वर्गणी भरत आहे.