टोमॅटोस डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे उत्पादन खर्च कमी पण फायदा मात्र अधिक

श्री. दयाराम तुळशिराम पवार (पाटील),
मु.पो. भडाणे, ता. बागलाण, जि. नाशिक


आम्ही टोमॅटो १० गुंठे शिवाजी या जातीची लागवड केली होती. सुरुवातीस जर्मिनेटर ३० मिली अर्धा लि. कोमट पाणी याप्रमाणे बिजप्रक्रिया केली. त्यामुळे बियांची उगवण फारच उत्तम झाली. रोपांवर असताना जर्मिनेटर, थ्राईवर प्रत्येकी ३० मिली १५ लि. पाणी या प्रमाणात दोन वेळेस फवारणी केली. रोपे जोमदार वाढली.

पानांना काळोखी मिळून रोपे सरळ वाढली. रोपे लावताना जर्मिनेटर २५० मिली + १० लि. पाण्यात रोपे बुडवून लावली. त्यामुळे मर झाली नाही किंवा गळ पडली नाही. लागवडीनंतर दहा दिवसांनी थ्राईवर, क्रॉपशाईनर व प्रोटेक्टंट प्रत्येकी ५० मिली + १५ लि. पाणी या प्रमाणात फवारणी केली. टोमॅटोची वाढ चांगली झाली. १५ दिवसांनी दुसरी फवारणी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर यांची प्रत्येकी ६० मिली १५ लि. पाणी या प्रमाणात फवारणी केली. फुलकळी मोठ्या प्रमाणात वाढली. फुलगळ झाली नाही. फुटवा चांगला झाला. व्हायरस, घुबड्या, करपा रोगांचा अजिबात त्रास नाही. तिसरी व चौथी फवारणी ५०० मिली पंचामृत १०० लि. पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने केली. फले भरपूर लागून टोमॅटोच्या फळांच्या संख्येत वाढ मोठ्या प्रमाणात झाली. या औषधासोबत किटकनाशकाचा वापर फारच कमी प्रमाणात केला. अळीचा प्रादुर्भाव कमी होता. पानावरील नागअळी इतरांच्या प्लॉटपेक्षा नगण्यच होती. बदला (२ नंबरचा) माल कमी निघाला. फवारण्या शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करीत असत. टोमॅटोस शाईनिंग अतिशय चांगली असल्याने इतरांपेक्षा कॅरेटमागे १० ते १५ रु. फरक पडून बाजार जास्त मिळत होते. उत्पादनखर्च कमी होऊन टोमॅटो मध्ये पैसे चांगले झाले. एकंदरीत ५० हजार रुपये झाले. हा अनुभव अतिशय चांगला वाटला.