अति पावसातही टोमॅटोचे १ लाख व्हावे - एक अपेक्षा, पण प्रत्यक्षात झाले ४।। लाख... !

श्री. सतीश मनोहरराव कुलकर्णी,
मु.पो. हुनजी (के), ता. भालकी, जि. बिंदर.
मो. ९८८०८०१९८८/९९७२७७६५८९


जुलै २००८ मध्ये एक एकर सिंजेटा कंपनीच्या हमसोना जातीची लागवड ४' x २' वर केली होती. जमीन भारी काळी आहे. अगोदर ऊस लावला होता. यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. आम्ही टोमॅटोवर नेहमीप्रमाणे सप्तामृताचे फवारे घेतले. कल्पतरू खतही २ बॅगा वापरले. पीक एक महिन्याचे असताना (८ ऑगस्ट २००८) गणेश चतुर्थीला पाऊस सुरू झाला तो १५ दिवस दररोज पडत होता. त्यामुळे इतरांचे पुर्ण प्लॉट गेले. मात्र आपल्या टोमॅटोस काहीही झाले नाही. पाने पुष्कळ आणि व्यवस्थित होती. एक एकरमध्ये १ लाख रु. झाले तरी आमची अपेक्षा पुर्ण होते. मात्र डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने या टोमॅटोचे ४।। लाख रु. झाले. म्हणून खास सरांना भेटण्यासाठी आज (२/१/२००९) आलो.

दलाल आम्हांला मार्केटला येऊ देत नाही, स्वार्थी हेतूने

टोमॅटो फळे आकर्षक आणि टिकाऊपणा अधिक असलेली मिळत असल्याने वाहीद हा बिहारचा एजंट टोमॅटोची जागेवरून ८०० ते ९०० रु. क्रेट भावाने खरेदी करून तो हैद्राबादला माल विकत असे. तो आम्हाला हैद्राबादला येऊ देत नसे. आम्हाला जागेवर मार्केटपेक्षा ५ - १०% भाव अधिक मिळत असल्याने आणि पॅकिंग आणि वाहतूक खर्च पूर्णतः वाचत असलयाने आम्हीही समाधानी होतो. मात्र यामध्ये दलालाचा उद्देश वेगळाच होता, कारण मार्केटमध्ये आमच्या मालाची चर्चा होत असे. त्यामुळे त्याला आमच्या मालातून अधिक पैसे मिळत. तेव्हा शेतकऱ्यांनी जागेवरून माल देण्यास हरकत नाही. परंतु मार्केटमध्ये सध्यस्थितीत आपल्या मालास जो भाव आहे. त्याची खात्री करावी. कारण डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने उत्पादनात वाढ तर होतेच, शिवाय दर्जेत त्याहूनही अधिक वाढ होते. त्यामुळे दलाल जागेवर (शेतात) जो भाव देतात, त्याहून अधिक भाव मार्केटमध्ये वेगवेगळ्या गाळ्यावर माल टाकल्यास निश्चितच मिळतो.

सरांच्या आशिर्वादाने टोमॅटोच्या उत्पादनातून मी तवेरा गाडी घेतली आहे. २३ नोव्हेंबर २००८ ला पुन्हा एक एकर हमसोना जातीच्या टोमॅटोची लागवड केली आहे. दीड महिन्यात सध्या झाडे २।। फूट उंचीची झाली आहेत. आतापर्यंत सप्तामृताच्या तीन फवारण्या घेतल्या आहेत. लागवडीच्या वेळी कल्पतरू सेंद्रिय खत ५० किलो वापरले. सध्या फुलकळी लागली आहे.