वाया गेलेला २० गुंठे टोमॅटोचा प्लॉट सुधारला

श्री. नारायण रामचंद्र ढोकणे, मु.पो. पांढुर्ली, ता. सिन्नर, जि. नाशिक


माझी पांढुर्ली येथे ५ एकर, काळी कसदार जमीन असून ती आजपर्यंत पारंपारिक पद्धतीने करत होतो. दि. ३१/०७/२००६ रोजी ट्रान्सपोर्टच्या कामानिमित्त वाशी फ्रुट मार्केटला गेलो होतो. त्यावेळी सहज चौकशीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी, वाशी सेंटर येथे टोमॅटो, वांगी, भात पिकांबद्दल माहिती घेतली. माझ्याकडे १५ दिवसापूर्वी वर्षा १० ग्रॅमची २ पाकिटे २० गुंठ्यामध्ये लावलेली आहेत. त्यांची चालू वर्षीच्या संततधार पावसामुळे वाढ होत नव्हती. म्हणून नाशिक सेंटर येथून १०० मिली पंचामृत औषध घेऊन गेलो व सांगितल्याप्रमाणे फवारणी केली. तर १० ते १५ दिवसात फरक जाणवला. तारेच्या वर फुटवे गेले, त्यामुळे गावातील इतर शेतकऱ्यांना डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीबद्दल माहिती दिली. नंतर मी पुन्हा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी दिंडोरी रोड, नाशिक येथून औषधे व कल्पतरू ५० किलो घेऊन गेलो. कल्पतरू खताची १ बॅग आणि २०:२०:० खताची १ बॅग अशी एकत्र मात्रा दिली सांगितल्याप्रमाणे औषध फवारणी करत आहे.