मोठ्या पावसाने खराब झालेली टोमॅटो रोपे जर्मिनेटरने सुधारली

श्री. पंडीत विठ्ठल इंचळे,
मु.पो. रासेगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक


नामधारी २५३५ टोमॅटोची ३० गुंठ्यामध्ये लागवड केली आहे. रोपांना गळ पडत होती. पाऊस मोठा होता. त्यामुळे वाफ्यावर रोपे खराब होऊन पावसाने प्लॉट खराब होत चालला होता. त्यावेळेस टोमॅटोची रोपे वाफ्यावर असताना जर्मिनेटर ५० मिली + १५ लि. पाणी अशी दाट (ड्रेंचिंगप्रमाणे) फवारणी केल्याने रोपे तरारून आली. एकही रोप वाया गेले नाही. नंतर ४ ते ५ दिवसांनी रोपे लावली. लागण केल्यानंतर ८ दिवसांनी थ्राईवर व क्रॉपशाईनर प्रत्येकी ५० मिलीची १५ लि. पाण्यातून फवारणी केली. त्यामुळे वाढ जोमाने झाली. बगल फुट भरपूर निघाली. दुसरी फवारणी थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ६० मिलीची केली असता, पानाला काळोखी चांगली आल्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. तिसरी फवारणी थ्राईवर, क्रॉपशाईनर व राईपनरची केली असता, फुल कळी जोरात लागली, मालाला शाईनिंग आली. त्यामुळे मार्केटला माल एका नंबरने विकला जात होता.