टोमॅटोला २ रु. किलो भाव मिळूनही १५ गुंठ्यात ४५ हजार निव्व्ल नफा

श्री. जगन्नाथ सुदाम पाडेकर,
मु. संतवाडी, पो. आळे, ता. जुन्नर, जि. पुणे
मो. ९८९०७३१८३९


ह्या अगोदर म्हणजे २००५ च्या उन्हाळ्यामध्ये टोमॅटो पीक घेतले होते. क्षेत्र १५ गुंठे, २ पुड्याची, लागवड प्रथम बियाणे जर्मिनेटरमध्ये भिजवून टाकले. नंतर रोप जर्मिनेटर द्रावणात भिजवून लावली. लागवडीनंतर कल्पतरू ५० किलो १५ गुंठ्याला वापरले. १२ x १० खताची १ बॅग, पोटेश १ बॅग व नंतर पुन्हा १ बॅग कल्पतरू सेंद्रिय खत वापरले. थ्राईवर + क्रॉपशाईनर + राईपनर + प्रोटेक्टंट ही औषधे माहिती पत्रकानुसार फवारली. ह्या कालावधीत उन्हाळ्यात पाणी कमी पडले. त्यामुळे ह्या टोमॅटोला पेप्सीच्या नळीचा ड्रिप बनवून फक्त १५ ते २० मिनिट दररोज चालवून ते पीक घेतले. तरी डॉ. बावसकर तंत्रज्ञानामुळे फुले व फळे भरपूर लागून ती पोसली व तेवढ्या क्षेत्रात ६०० कॅरेट माल निघाला. त्यापासून ४५,००० रु. नफा मिळाला. त्यावेळेस फक्त ६० रु. कॅरेटला भाव होता. तेव्हा आम्हाला ७० - ८० रु. कॅरेट भाव मिळत होता. एकूण खर्च १२,००० रु. झाला. त्यामुळे मी ह्या तंत्रज्ञानावर खुप खुष आहे.