दहा गुंठ्यात ३०० कॅरेट टोमॅटो

श्री. पंढरीनाथ भाऊसाहेब घाडगे,
मु.पो. पिंपळवंडी, ता. जुन्नर, जि. पुणे


मी गेली ४ वर्षपासून नारायणगाव सेंटरच्या विक्री प्रतिनिधींच्या सल्ल्यानुसार डॉ. बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांचा वापर करित आहे. ह्या वर्षी टोमॅटोला सप्तामृत औषधे वापरली. प्रथम रोपे तयार करण्यासाठी १५ ग्रॅम बियाणे १ ग्लास पाण्यामध्ये दीड बुच (१५ मिली) जर्मिनेटर घेऊन त्यामध्ये ३ तास बी भिजवून सावलीत वाळवून लावले असता ५ ते ६ व्या दिवशी सर्व बियाणे उगवून आले. त्याची वाढही जोमाने होऊ लागली. नंतर २७ दिवसांनी त्या रोपांची लागवड केली. त्या वेळेस रोप जर्मिनेटर + बाविस्टीनच्या द्रावणात भिजवून लावले.

लागवडीनंतर ८ व्या दिवशी जर्मिनेटर ३० मिली + क्लोरोपायरीफॉस २० मिली + ब्ल्यु कॉपर ५० ग्रॅम हे १० लि. पाण्यामधील द्रावण झाडांच्या मुळाशी सोडले. नंतर ८ दिवसांनी पहिला खताचा डोस दिला. कल्पतरू सेंद्रिय खत ४० किलो + पेंड २५ किलो + १८:४६:२५ किलो असा डोस दिला. पुन्हा २५ दिवसांनी वरीलप्रमाणे वरील मात्रेचाच डोस दिला. तिसरा डोस कल्पतरू २५ किलो + पेंड २५ किलो + ५:१०:५ २५ किलो +१८:४६ १५ किलोचा फळ सुरू झाल्यावर दिला.

पहिली फवारणी लागवडीनंतर १० दिवसांनी जर्मिनेटर ३० मिली + थ्राईवर ३० मिली + क्रॉपशाईनर ३० मिली + एन्डोसल्फान १५ मिली प्रमाणे केली. नंतर १५ दिवसांनी थ्राईवर ३५ मिली + क्रॉपशाईनर ३५ मिली + प्रोफेक्स २० मिली ची दुसरी फवारणी केली, नंतर १५ दिवसांनी राईपनर ३० मिली + थ्राईवर ४० मिली + क्रॉपशाईनर ४० मिली + रिडोमिल १० ग्रॅमची तिसरी फवारणी केली. नंतर पुन्हा १५ दिवसांनी राईपनर ४० मिली + थ्राईवर ४० मिली + क्रॉपशाईनर ४० मिली + कवच २५ ग्रॅमची चौथी फवारणी केली.

७० व्या दिवशी क्रॉपशाईनर ५० मिली + राईपनर ५० मिली + कॅपटॉफ २५ ग्रॅम + एकालक्स २५ मिली ची पाचवी फवारणी केली.

शेवटी पुन्हा शेंडा चालण्यासाठी जर्मिनेटर ४० मिली + थ्राईवर ५० मिली + राईपनर ५० मिली + क्रॉपशाईनर ५० मिली वापरले. हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे १० गुंठ्यात १ तोडा ४५ कॅरेटचा निघाला. आतापर्यंत २५ किलो वजनाचे २२५ कॅरेट टोमॅटो माल विकला असून अजूनही माल चालू आहे. एकूण सर्व मजूरी, खत, तोडणीसह १०,००० रु. खर्च झाला. आजपर्यंत ३५,०००/- रु. झाले आहेत. १७० रु. कॅरेटने आजही माल विकला जात आहे. आम्ही जागेवरून ७ ते ८ रु. किलोने माल देत आहे. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे वापरल्यामुळे मला एवढे उत्पन्न मिळाले आहे.