धोधो पावसातही टोमॅटो प्लॉट निरोगी

श्री. दौलत काशिनाथ भवर,
मु.पो. गणेशगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक


नामधारी उत्सव ८ पाकिटे अर्धा लिटर पाण्यामध्ये जर्मिनेटर ३० मिली घेऊन त्याद्रावणात ६ तास भिजवुन नंतर वाफ्यावर टाकले. उगवण ९९% झाली. रोपे जळी पडणे (वाळून जाणे), मर होणे, गळ पडणे असे आमच्या वाफ्यावरती घडलेच नाही.

रोपांची लागवड केल्यानंतर पाऊस जोरात चालू होता. त्यामुळे प्लॉटमध्ये पाणीच पाणी झाले होते. आता प्लॉट गेल्यात जमा होणार तेव्हा तिसऱ्या दिवशी १५ लिटर पंपास थ्राईवर ५० मिली, क्रॉपशाईनर ५० मिली व किटकनाशक घेऊन फवारणी केली. ही फवारणी चालू असताना आजूबाजूचे शेतकरी मला वेड्यात काढत होते की, तु विनाकारण खर्च करत आहे. शेजारील प्लॉटमधील रोपे पाण्यामुळे गेली. आमच्या प्लॉटमधील सर्व रोपे तरारून आली. थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ७५० मिली २०० लि. पाणी अशा १० दिवसाच्या अंतराने फवारण्या केल्या. एकंदर ४ फवारण्या झाल्या. टोमॅटोमध्ये फुटवा, बगल फुटी जोरात निघाल्या. फुलकळी मोठ्या प्रमाणात आली. पाने रुंद व रफ झाली. पत्तीचे पोषण चांगले झाल्यामुळे टोमॅटोची वाढ झपाट्याने झाली. तारेवर लवकर बांधण्यास आली. पानाला काळोखी चांगलंही आली. व्हायरस, नागआळी, घुबडया अजिबात आलेला नाही. फुलगळ झाली नाही. पुढच्या फवारणीसाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर बरोबर फळाचे पोषण होण्यासाठी राईपनर घेत आहे. प्लॉटमध्ये दुरी निघेल (खोडवा घेता येईल) अशी अपेक्षा आहे.