पंचामृतामुळे करपा नाही, टोमॅटोचे भाव पडले तरी माझ्या दर्जेदार टोमॅटोस ७ - ८ रु. भाव जादा

श्री. सुरेश भिमाजी उगले,
मु.पो. बासगाव पिंपरी, ता. सिन्नर, जि. नाशिक


मी १७/६/२००३ रोजी नामधारी २५३५ पंधरा गुंठे लागवड केली. सुरुवातीस बियाणे जर्मिनेटरच्या द्रावणात (३० मिली जर्मिनेटर + १ लि. पाण्यात) बुडवून ५ तास ठेवले. बियांची उगवण चांगली झाली. त्यानंतर रोपे जर्मिनेटर २५० मिली/१० लि. पाणी यामध्ये बुडवून लावली. लागवडीनंतर दहाव्या दिवशी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या पंचामृतातीळ जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ३ मिली आणि प्रोटेक्टंट ३ ग्रॅम १ लि. पाणी या प्रमाणात फवारणी केली. झाडे तरारून आली. पाने सतेज झाली. झाडांची वाढ चांगली झाली. दुसरी फवारणी वरील फवारणीनंतर २० दिवसांनी प्रत्येकी ४ मिली/लि. पाणी या प्रमाणात केली. फुटवा मोठ्या प्रमाणात झाला. प्लॉट हिरवागार राहून करपा, घुबडया आला नाही. व्हायरसचे प्रमाणे नगण्य होते. फुलकळी वाढली. तिसऱ्या फवारणीत प्रत्येकी ५ मिली/लि. घेऊन १५ दिवसांच्या अंतराने फवारणी केली. टोमॅटो प्लॉट अतिशय चांगला झाला. फुलकळी अजिबात गळली नाही. आमच्याकडे ऑगस्ट महिन्यात करपा रोग अजिबात आला नाही. इतरांकडे फारच जाणवत होता. मी काळजीपुर्वक वरील औषधांच्या फवारण्या केल्या. आता माझे टोमॅटो सुरू झाले आहे. झेंडूसाठी थ्राईवर, क्रॉपशाईनरच्या फवारण्या घेतल्या. फुलापासून साधारण १५ दिवसांनी ४०० ते ५०० रु. होतात. सुरुवातीस आपली टेक्नॉलॉजी महाग वाटली. परंतु फायदा सुद्धा त्याच्या कितीतरी पटीने जादा होतो. साधारण १५ गुंठे रानातून १० ते १५ कॅरेट दिवसाआड माल निघतो. सुरुवातीस टोमॅटोस दर कमी होते. परंतु माझा माल उजवा असल्याने इतरांपेक्षा कॅरेट मागे ७ ते ८ रु. जास्त भाव मिळायचा. माळ नंतर वाढत जाऊन ३० ते ४० कॅरेट टोमॅटो निघायला लागली. तेव्हा बाजार भाव ४० ते ६० रु. मिळू लागले. बाजारभाव नंतर वाढण्यास सुरुवात झाली. मालाची आवक कमी होताच ११० ते १२० रु. कॅरेट असा दर मिळाला. पाऊस सुरू झळयाने इतरांचे प्लॉट गेल्यात जमा होते. माझा प्लॉट अद्याप निरोगी आहे. मला नोकरी करून हे काम करावे लागते. नोकरी पेक्षा हे परवडते.