सेवाग्राम (वर्धा) येथे 'सिद्धीविनायक' शेवग्यावर परिसंवाद

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर



हवामान बदलामुळे आणि पाऊसमान कमी झाल्यामुळे विदर्भतही पारंपारिक कापूस, संत्रा, कडधान्य या पिकांना पर्याय म्हणून 'सिद्धीविनायक' शेवगा या पिकाविषयी उत्सुकता विदर्भातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये होती आणि त्यांच्या विनंतीवरून सेवाग्राम जि. वर्धा येथे ज्या हॉलमध्ये महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचे पहिले रणशिंग फुंकले त्याठिकाणी 'सिद्धीविनायक' शेवग्यावर एक दिवसाचा परिसंवाद ९ डिसेंबर २०१५ रोजी आयोजीत केला होता. या चर्चासत्रामध्ये विदर्भातील ७ - ८ जिल्ह्यातील ७०० ते ८०० शेतकरी आले होते. श्री. धैर्यशील बावसकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्तावीक केले. डॉ. बावसकर सरांनी उपस्थित शेतकऱ्यांना, डिलर्सना आणि विदर्भातील स्टाफ यांना सखोल मार्गदर्शन केले. विदर्भातील पारंपारिक पिके जसे कापूस, तूर, मूग, उडीद या आंतर पिकांबरोबर शेवगा हा कसा पर्याय ठरू शकतो या विषयी मार्गदर्शन झाले. फक्त येथे काळ्या जमिनीत शेवगा लावू नये. तसेच शेवगा लावताना तो अर्धा ते एक एकरपेक्षा जास्त लावू नये. शेवग्याच्या कडधान्यांचे आंतरपीक घ्यावे. तसेच विविध भागातील अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे असे सरांनी सुचविले. अडीच तासाच्या मार्गदर्शनानंतर दिड तास प्रश्नोत्तराचा तास झाला. अमरावतीचे सुधीर लढ्ढा, कृषी क्रांती नागपूरचे आनंद जाजोडीया उपस्थित होते. फोरसाईट अॅग्रो कन्सल्टंट नागपूरचे श्री. बस्तेवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रगतीशील शेतकरी श्री. बोंबटकर यांनी त्यांचे अनुभव कथन केले. विदर्भातील चंद्रपूर, भंडार, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, वर्धा येथील धान पीक तसेच मिरची, टोमॅटो व कडधान्यास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीजी वापरल्याने पावसातही उत्पादन चांगले मिळाल्याचे अनुभव शेतकऱ्यांनी सांगितले. दुपारनंतर श्री. बोंबटकर यांच्या 'सिद्धीविनायक' शेवगा प्लॉटवर शिवारफेरी झाली. हा प्रयोग विदर्भात नवीन असल्याने जास्तीजास्त काळजी घ्यावी व त्याची येणारी निरीक्षणे आमच्याकडे पाठवावीत. म्हणजे पुढील दिशा ठरविताना त्याचा लाभ होईल. यावेळी वर्धा येथील फोरसाईट अॅग्रो कन्सल्टंटला सरांनी भेट दिली.