३० गुंठे गुलछडी एकूण खर्च ७५ हजार, विक्री १।। लाख मालाचे तोडे सुरूच

श्री. दत्ता ज्ञानोबा शारूक,
मु.पो. नांदगाव, ता. वाशी, जि. उस्मानाबाद.
मो. ९९२१९४४८१९


माझी २२ एकर शेती आहे. परंतु प्रयोगशिलतेतून मी ३० गुंठे क्षेत्रावर गुलछडी या जी - ३ वाणाचे ठिबकवर ४ x १.२५ फुटावर ३० मे २०१५ ला लागवड केली. साधारणत: ३ ते ३.५ महिन्यांनी फुले मिळण्यास सुरुवात झाली. साधारणत: डिसेंबर - जानेवारीपर्यंत मला रोज ९ ते १० किलो फुले मिळत असत. त्यानंतर मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. अलोक पाटील (मो. ९५५२९७३२९६) हे माझ्या शेतावर येऊन भेटले. त्यांनी मला जर्मिनेटर, प्रिझम व कल्पतरू खताची माहिती दिली. त्यामुळे मी फुटवे (ओलांडे) अधिक फुटण्यासाठी जर्मिनेटर व प्रिझम चा वापर केला. मला १००% रिझल्ट मिळाला व उत्पन्नातही वाढ झाली. पण उन्हाच्या दाहकतेमुळे पाने करपण्याची प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे त्यांनी मला सप्तामृताची फवारणी घेण्यास सांगितले. सप्तामृताच्या दोन फवारणीतच मला फरक जाणवला. करपा पुर्ण थांबला व फुलाच्या तोड्यात मोठ्या प्रमाणात. वाढ झाली. रोज १४ ते १५ किलो फुले मिळू लागली. काही दिवस मी हैद्राबादला ही फुले पाठविली. भावही २०० रु./किलो मिळत होता. परंतु वाहतुकीच्या अडचणीमुळे लोकल मार्केटलाच पाठवित आहे. येथे भाव ७५ रु. प्रति किलो मिळत आहे. आजच्या दुष्काळी परिस्थितीतही रोज १८ ते २० किलो पर्यंत मालाचे तोडे चालू आहेत. जागेवरून ७५ रु. प्रमाणे फुले जातात. दररोज १३०० ते १५०० रु. मला मिळत आहेत.

यासाठी बेणे ४० हजार रु., ठिबक ३० हजार रु. आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या दर १५ द्विस ते १ महिन्याला घेत आहे. त्याचा ५ हजार रु. असा आतापर्यंत एकूण ७५ हजार रु. खर्च आला असून १ लाख ५० हजार रु. ची आतापर्यंत फुले विकली आहेत. आता ही फुले दररोज सतत चालू राहणार आहेत. जमीन भारी काळी असल्याने खते दिली नाहीत. वातावरणही अनुकूल असल्याने जादा फवारण्याची आवश्यकता भासत नाही. फक्त उत्पादनात वाढ व दर्जा मिळण्यासाठी १५ ते ३० दिवसातून एकदा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी घेत आहे. घरचीच ४ माणसे सकाळी ५.३० ते ८.०० वाजेपर्यंत १८ ते २० किलो फुले तोडतात. हे फक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्यांमुळे शक्य होत आहे. त्यामुळे मी मे महिन्यात अजून ८ एकर क्षेत्रावर नव्याने गुलछडीची लागवड डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या तंत्राने केली आहे. ४ फुटाच्या बोधावर १.२५ फुटावर लागवड ठिबकवर आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आपल्या शेतीत हमखास यश संपादन करावे.